Jio Cinema : जिओ सिनेमाने मारली बाजी, ११० दशलक्ष प्रेक्षकांनी लूटला फिफा वर्ल्ड कपचा आनंद
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jio Cinema : जिओ सिनेमाने मारली बाजी, ११० दशलक्ष प्रेक्षकांनी लूटला फिफा वर्ल्ड कपचा आनंद

Jio Cinema : जिओ सिनेमाने मारली बाजी, ११० दशलक्ष प्रेक्षकांनी लूटला फिफा वर्ल्ड कपचा आनंद

Published Dec 20, 2022 04:43 PM IST

Reliance Jio : कतारमध्ये झालेला फिफा वर्ल्ड कपचा अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील सामना भारतात आतापर्यंत सर्वाधिक प्रेक्षक लाभलेलावर्ल्ड कप होता. या अंतिम सामन्यात जिओ सिनेमाचा प्रेक्षकवर्ग अंदाजे ११० अब्जाच्या घरात होता.

FIFA world Cup HT
FIFA world Cup HT

Reliance Jio : फिफा वर्ल्ड कप २०२२ च्या प्रक्षेपणाची जबाबदारी जिओ सिनेमाने यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच घेतली. संपूर्ण फिफा वर्ल्ड कपचे प्रक्षेपण जिओ सिनेमावर करण्यात आले होते. प्रत्येक मॅच जिओ सिनेमावरच प्रेक्षकांना पाहता आली. पण कतारमधील अंतिम सामन्यात डिजीटल प्रेक्षकांच्या यादीत जिओ सिनेमाने अव्वल स्थान पटावले आहे. या दिवशी जवळपास ११० दशलक्षांपेक्षा अधिक प्रेक्षकांनी हा सामना जिओ सिनेमावर पाहिला. 

अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामान्यातील प्रत्येक क्षण रोमांचकारी होता. दोन्ही संघांनी चुरशीची टक्कर दिली. या दोन्ही संघातील कांटे की टक्कर जिओ सिनेमाने क्षण अन् क्षण टिपली. श्वास रोखून धरणारा अखेरच्या क्षणापर्यंतचा हा सामना प्रत्येक फुटबॉल प्रेमीने आपल्या डोळ्यात साठवला. भारतासह जगभरात हा सामना प्रत्येकांपर्यंत मोफत पोहोचवण्याचे काम जिओ सिनेमाने चोखपणे पार पडले. एकट्या भारतातीलच जवळपास ११० दशलक्षांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी हा सामना जिओ सिनेमावर पाहिला.

फिफा वर्ल्ड कपसाठी ११० दशलक्षांपेक्षा जास्त दर्शकांसह सर्वाधिक डिजिटल प्रेक्षक असलेल्या देशांपैकी भारत एक होता. संपूर्ण स्पर्धेत आयओएस आणि अॅड्राॅईड वर डाउनलोड केलेले प्रथम क्रमांकाचे जिओ सिनेमा हे विनामूल्य अॅप राहिले.

अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्सचा सामना सुरू होण्याआधी रेकॉर्डब्रेक जिओ सिनेमा अॅप डाऊनलोड करण्यात आले. तीन तास चाललेला हा थरार लोकांनी जिओ सिनेमावर पाहिला. याआधी आयपीएल आणि वर्ल्डकपचे सामने हे मोबाईलवर पाहता आले. पण अर्जेंटिना आणि फ्रान्सचा सामना हा क्रिकेट सामन्यांपेक्षा मोठे संख्येनं पाहिला गेला.

जिओ सिनेमा २० नोव्हेंबरपासून आयओएस आणि अँड्रॉइड अशा दोन्ही सिस्टिमवर तीन आठवड्यात सर्वाधिक डाऊनलोड केलेलं फ्री अॅप ठरलं आहे. याआधी कधीच पाहण्यात आला नव्हता असा हाइप मोड देऊन जिओ सिनेमाने प्रेक्षकांचा लाइव्ह सामना पाहण्याचा अनुभव आणखी सुंदर केला. यासाठी व्हॉइस अॅक्टिव्हेटेड एआर लेन्ससाठी स्नॅप इंकसोबत भागिदारी करण्यात आली होती. तर महिंद्रासोबत भारतात फुटबॉलमधील अनहेल्ड हिरोजचा सन्मान करणारी एक सिरीज तयार करण्यात आली होती.

Whats_app_banner