Reliance Jio: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ ग्राहकांना अनेक प्रीपेड प्लॅनसह रिचार्ज करण्याचा पर्याय देत आहे. यातील काही प्लान असेही आहेत, ज्यात ग्राहकांना ओटीटी सर्व्हिसेसचे सब्सक्रिप्शन पूर्णपणे मोफत मिळते. कंपनी खास जिओ टीव्ही प्रीमियम प्लानही ऑफर करत आहे. या प्लानची खासियत म्हणजे एकाच रिचार्जमध्ये ग्राहकांना १२ ओटीटी अॅपचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. चला तर मग या प्लानबद्दल जाणून घेऊयात.
रिलायन्स जिओचा हा डेटा ओनली प्लान २८ दिवसांची वैधता देतो. यासाठी संपूर्ण वैधता कालावधीसाठी एकूण १० जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानद्वारे अॅक्टिव्ह रिचार्ज करता येईल आणि अतिरिक्त डेटा वापरता येईल. या प्लानमध्ये अतिरिक्त डेटाव्यतिरिक्त १२ ओटीटी सेवांचा अॅक्सेस मिळतो.
अॅप्सच्या यादीमध्ये सोनीलिव्ह, झी 5, जिओ सिनेमा प्रीमियम, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सन एनएक्सटी, कांछा लांका, प्लॅनेट मराठी, चौपाल, होईचोई आणि जिओ टीव्ही यांचा समावेश आहे.
डेली डेटासह फ्री ओटीटी सेवेचा आनंद घ्यायचा असेल, तर ४४८ रुपयांचा प्लान चांगला पर्याय ठरू शकतो. या प्लानची वैधता २८ दिवसांची असून यात दररोज २ जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय, ग्राहकांना दररोज १०० एसएमएस पाठवता येतील आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देखील करता येईल. यामुळे रिचार्जर्सना २८ दिवसांसाठी १२ ओटीटी सेवांचा कंटेंट अॅक्सेस करण्याचा पर्याय मिळतो.
यामध्ये सोनीलिव्ह, झी 5, जिओसिनेमा प्रीमियम, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सन एनएक्सटी, कांछा लांका, प्लॅनेट मराठी, चौपाल, होईचोई, फॅनकोड आणि जिओ टीव्ही यांचा समावेश आहे. जिओटीव्ही अॅपच्या माध्यमातून सर्व सेवांचा वापर करता येणार असून मायजिओ खात्यात जिओसिनेमा प्रीमियमचे कूपन आहे. पात्र ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा देखील दिला जात आहे.
टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एका नव्या प्रकारचा घोटाळा किंवा फसवणुकीचा इशारा दिला आहे, ज्याला प्रीमियम रेट सर्व्हिस स्कॅम म्हटले जात आहे. या घोटाळ्यात युजर्सला इंटरनेटवरून मिस्ड कॉल्स येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्या क्रमांकावर पुन्हा कॉल करू नये, अन्यथा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावा लागेल, असे कंपनीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
संबंधित बातम्या