मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jio Plus : जिओचा नवा फॅमिली प्लान; एका रिचार्जवर संपूर्ण कुटुंबाला सेवा, पहिला महिना पूर्ण मोफत

Jio Plus : जिओचा नवा फॅमिली प्लान; एका रिचार्जवर संपूर्ण कुटुंबाला सेवा, पहिला महिना पूर्ण मोफत

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 15, 2023 09:17 PM IST

Jio Plus new family plan : रिलायन्स जिओमध्ये ग्राहकांना परवडणाऱ्या दरात अनेक रिचार्ज प्लान्स मिळतात. पण आता रिचार्जची अनोखा प्लान्स कंपनीने आणला आहे. एका रिचार्जमध्ये संपूर्ण कुटुंबाचे नेटवर्क चालणार आहे. काय आहे, वेगळेपण या प्लान्सचे जाणून घेऊ.

jio plan HT
jio plan HT

Jio plus new family plan : रिलायन्स जिओचे रिचार्ज प्लॅन्स हे सर्वसाधारणपणे परवडणाऱ्या दरात असतात. हीच जिओच्या प्री पेड आणि पोस्टपेड प्लॅनची खासियत आहे. आता जिओने त्यात नवीन शक्कल लढवून संपूर्ण कुटूंबासाठी एकच रिचार्ज प्लॅन अशी योजना आणली आहे.

सर्वसाधारणपणे एकाच कुटूंबातील ४ सदस्यांना जोडणारा पोस्ट प्लॅनसाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण या रिचार्ज प्लॅन्मध्ये ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार कनेक्शन निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणजेच ग्राहक एकाचवेळी दोन, तीन, चार कनेक्शन्स जोडू शकतात. त्यानुसार किंमत मोजावी लागणार आहे.

जिओने २९९ रुपये, ३९९ रुपये, ५९९ रुपये आणि ६९९ रुपये किंमतीचे चार नवीन प्लान लॉन्च केले आहेत. हे सर्व प्लॅन २२ मार्चपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. यातील बेसिक २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, ३० जीबी डेटा, अमर्यादित एसएमएस सारख्या सुविधा मिळतात. दुसरीकडे, दुसरा प्लान ५९९ रुपयांचा आहे, ज्यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस, डेटा आणि एसएमएसची सुविधा मिळते. तुम्ही या प्लॅनची मोफत ट्रायल देखील घेता येते. ग्राहकांना एका महिन्यासाठी हा प्लॅन ट्रायल म्हणून वापरता येईल.

३९९ रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित कॉलिंगसह ७५ जीबी डेटा, अमर्यादित एसएमएस आणि तीन कनेक्शन अॅड-ऑनची सुविधा मिळते. प्रत्येक अॅड-ऑन कनेक्शनसाठी तुम्हाला अतिरिक्त ९९ रुपये मोजावे लागतील. या प्लॅनची तुम्ही मोफत ट्रायलही घेता येईल.

६९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, १०० जीबी डेटा आणि अमर्यादित एसएमएस सुविधा मिळते. यामध्ये यूजर्सना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम सारख्या ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळेल. तुम्ही जिओ च्या या प्लॅनमध्ये ३ अतिरिक्त कनेक्शन देखील जोडता येतील.

जर तुम्ही नवीन ग्राहक असाल तर सिम ॲक्टिव्हेट करण्यासाठी ९९ रुपये आकारले जातील. याशिवाय तुम्हाला ५०० रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून भरावे लागतील. तथापि, तुम्ही जिओ फायबर ग्राहक, कॉर्पोरेट कर्मचारी, विद्यमान नॉन-जिओ पोस्टपेड युझर आणि काही अन्य लोकांसाठी सिक्युरिटी डिपॉझिट माफ आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग