Jio Cheapest 84 Days Validity Plan: : जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांनी काही काळापूर्वीच आपले सर्व प्लानच्या किंमती वाढवल्या आहेत. या महागाईनंतरही जर तुम्हाला ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत जवळपास ३ महिने तुमचे सिम अॅक्टिव्ह ठेवायचे असेल तर या खास प्लानबद्दल जाणून घेऊयात. स्वस्त प्लान देणाऱ्या जिओचा ४७९ रुपयांचा ८४ दिवसांचा व्हॅलिडिटी प्लॅन आहे. जिओचा हा प्लॅन व्हीआयच्या ८४ दिवसांच्या प्लानपेक्षा स्वस्त आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना कोणते फायदे मिळतात, हे जाणून घेऊयात.
दरम्यान, ८४ दिवसांची वैधता असलेल्या जिओच्या सर्वात स्वस्त ८४ दिवसांच्या प्लानची किंमत ४७९ रुपये आहे. या प्लानमध्ये तुम्हाला जवळपास ३ महिन्यांची वैधता मिळते. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. ८४ दिवस चालणारा हा प्लान जिओचा सर्वात स्वस्त प्लान आहे. या प्लानमध्ये तुम्हाला एकूण ६ जीबी डेटा मिळतो. ४७९ रुपयांच्या या प्लानमध्ये तुम्हाला ८४ दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह १००० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते.
प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊडचे सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानमध्ये ६ जीबी डेटा संपूर्ण ८४ दिवसांसाठी आहे. पण तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एका दिवसात ६ जीबी डेटा ही संपवू शकता. जर तुम्हाला नंतर डेटाची गरज असेल तर तुम्ही जिओच्या डेटा अॅड-ऑन प्लानने रिचार्ज करू शकता.
पेटीएम, फोनपेवर तुम्हाला हा प्लान दिसणार नाही. या प्लानद्वारे रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला माय जिओ अॅप डाऊनलोड करावे लागेल. या अॅपच्या मदतीने तुम्ही हा प्लान रिचार्ज करू शकाल. हा प्लान तुम्हाला व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये दिसेल.
व्होडाफोन आयडियाच्या सर्वात स्वस्त ८४ दिवसांच्या प्लानची किंमत ५०९ रुपये आहे. हा प्लान कंपनीचा सर्वात स्वस्त ८४ दिवसांचा प्लान आहे. यात एकूण ६ जीबी डेटा दिला जातो. व्हीआयच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते. ज्यांना डेटाची गरज नाही पण कॉलिंगची गरज आहे आणि सिम चालू ठेवा, त्यांच्यासाठी हा प्लान चांगला आहे. या प्लानमध्ये ८४ दिवसांसाठी १००० एसएमएस मिळतात.
संबंधित बातम्या