Reliance Jio Tariff Hike: टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी जिओने भारतातील इतर खासगी कंपन्यांसह ३ जुलैपासून शुल्कवाढीची घोषणा केली. उद्यापासून नवी दरवाढ लागू होणार आहे. याआधीच ग्राहक रिचार्ज करून आपले पैसे वाचवू शकतात. जिओ युजर्स मासिक, तिमाही किंवा वार्षिक कालावधीचे प्लान रिचार्ज करू शकतात.
रिलायन्स जिओने घोषणा केली आहे की, आता लाखो युजर्सना पूर्वीप्रमाणे स्वस्त प्लॅनसह रिचार्ज केल्यास अनलिमिटेड 5जी डेटाचा लाभ दिला जाणार नाही. कंपनी आधी 5 स्वस्त प्रीपेड प्लॅनसोबत अनलिमिटेड 5 जी डेटा ऑफर करत होती, त्यांच्यासोबत रिचार्ज केल्यास आता मर्यादित डेली डेटा मिळेल आणि हा डेटा 4G स्पीड देईल.
मर्यादित डेटा (एकूण २ जीबी) असलेला प्लॅन 4G फोन असलेल्या युजर्ससाठी महत्त्वाचा आहे. एक महिन्याच्या वैधतेसह हा सर्वात किफायतशीर प्लान आहे, ३ जुलैनंतर या प्लानसाठी १८९ रुपये द्यावे लागेल.
जिओच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह दररोज २ जीबी 4G डेटा आणि अनलिमिटेड 5G वापराचा सर्वात स्वस्त अॅक्सेस मिळतो. 3 जुलैनंतर या प्लॅनची किंमत ३४९ रुपये असेल.
जिओच्या ५३३ रुपयांच्या प्लॅनमध्ये ५६ दिवसांची वैधता आणि दररोज २ जीबी ४जी डेटा कॅप आणि अनिर्बंध ५जी अॅक्सेस मिळतो. 3 जुलैपासून हा दर ६२९ रुपयांवर पोहोचला आहे.
जिओच्या ७४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ९० दिवसांची वैधता आणि दररोज २ जीबी ४जी डेटा, अनलिमिटेड ५जी अॅक्सेस मिळतो. यात अतिरिक्त २० जीबी ४जी डेटासह क्रिकेट ऑफरचा समावेश आहे.
३६५ दिवसांची वैधता असलेला सर्वात किफायतशीर वार्षिक प्लॅन, दररोज २.५ जीबी ४जी डेटा आणि अनलिमिटेड ५जी अॅक्सेस ऑफर करतो. 3 जुलैनंतर या प्लॅनची किंमत 3599 रुपये असेल.
संबंधित बातम्या