Jio offers: देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ त्याच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आणत असते. नुकताच जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी २६९ रुपयांचा लॉन्च केला. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, भरमसाठ डेटासह Jio Saavn Pro चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळत आहे. जिओच्या या प्लानमध्ये ग्राहकांना इतर स्पर्धक कंपनीच्या प्लानपेक्षा जास्त डेटा मिळतो.
रिलायन्स जिओचा २६९ रुपयांचा प्लान केवळ २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ४२ जीबी डेटा मिळेल. या प्लानमध्ये दररोज अनलिमिटेड कॉल्स आणि १०० मेसेज मिळतात. हा प्लान मोफत Jio Saavn Pro सबस्क्रिप्शनसह येतो. याशिवाय, Jio Quad, Jio Cinema आणि JioTV यासह Jio प्लॅटफॉर्मवर मोफत सब्सक्रिप्शन मिळते.
एअरटेलच्या या प्लानमध्ये तुम्हाला दररोज एक जीबी डेटा मिळतो. यासोबतच यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री डेटाची सुविधा मिळते. एअरटेलच्या या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये दररोज १०० मॅसेजची सुविधा मिळते.या प्लानमध्ये ग्राहकांना हॅलो ट्युनची सुविधा देखील मिळते. याशिवाय, विक म्युझिकचे सबस्क्रिप्शन मोफत मिळत आहे.
जिओ आणि एअरटेलच्या प्लानमध्ये जास्त फरक जाणवत नाही. जिओच्या २६९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. तर, एअरटेलच्या या प्लानमध्ये ग्राहकांना १ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच जिओच्या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण ४२ जीबी डेटा मिळतो. तर, एअरटेल त्यांच्या ग्राहकांना ३० जीबी डेटा मिळत आहे. अवघ्या ४ रुपयांत ग्राहकांना १४ जीबी डेटा जास्त मिळत आहे. या दोन्ही प्लानची वैधता २८ दिवसांची आहे.