Jio SoundPay service: छोट्या दुकानांपासून मोठ्या स्टोअर्सपर्यंत तुम्हाला साउंडबॉक्स दिसतील, ज्यावर क्यूआर कोडद्वारे पेमेंट केल्यास ते लगेच पेमेंट मिळाल्याचं सांगतात. या साउंडबॉक्ससाठी दुकान किंवा दुकानातील लोकांना दरमहा पैसे मोजावे लागतात. रिलायन्स जिओने आता हा गेम पूर्णपणे पलटवत जिओ साऊंड पे नावाची नवी सेवा सादर केली आहे. यामुळे साउंडबॉक्सची गरज पूर्णपणे दूर होईल.
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच सादर करत असते. आता प्रजास्ताक दिनानिमित्त जिओ जिओसाउंडपे सर्विस लाँच करणार आहे. ही सुविधा जिओभारत फोनमध्ये जीवनभर मोफत असणार आहे. जिओसाउंडपे च्या माध्यमातून कोणत्याही साउंड बॉक्सविना यूपीआय पेमेंट अलर्ट मिळणार आहेत. भारतात कोणत्याही मोबाइल फोनमध्ये उपलब्ध होऊ शकणारी ही पहिलीच सुविधा आहे. देशातील ५ कोटीहून अधिक छोटे उद्योजक व व्यापाऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे.
रिलायन्स जिओने स्पष्ट केले आहे की, जिओ साऊंडपे सेवा कायमची मोफत आहे आणि यासाठी वापरकर्त्यांना वेगळे पैसे मोजावे लागणार नाहीत. वास्तविक, कंपनीने कोणतेही वेगळे डिव्हाइस किंवा साउंडबॉक्स आणलेले नसून ते जिओ भारत फोनचा भाग बनवण्यात आले आहे. म्हणजेच युजर्सला त्यांच्या जिओभारत फोनच्या माध्यमातून व्हॉईस नोटिफिकेशन्स ऐकायला मिळतील. या माध्यमातून व्यापाऱ्यांची दरवर्षी १५०० रुपयांपर्यंत बचत होईल, असा दावा केला जात आहे.
जिओचा दावा आहे की, आपल्या जिओ भारत डिव्हाइसेसवर जिओ साऊंडपे या नवीन फीचरमुळे ते सेव्ह करू शकतील आणि त्यांना कोणत्याही साउंड बॉक्सची गरज भासणार नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या फीचरमुळे देशभरातील सुमारे पाच कोटी छोट्या व्यापाऱ्यांचे जीवन सुकर होणार आहे. हे उद्योगाचे पहिले पूर्णपणे विनामूल्य वैशिष्ट्य आहे, तर उर्वरित विद्यमान पर्याय स्वतंत्रपणे भरावे लागतील.
पेटीएम आणि फोनपे सारख्या कंपन्यांचे सध्याचे साउंडबॉक्स वापरण्यासाठी तुम्हाला वन टाइम पेमेंटव्यतिरिक्त दरमहा १२५ रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. अशा प्रकारे वार्षिक सुमारे १५०० रुपये खर्च येतो, तर छोट्या आणि सूक्ष्म आकाराच्या व्यापाऱ्यांना यापुढे जिओसाऊंडपेसह एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही आणि नवीन सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे.
कंपनीने सांगितले की, जिओ साउंडपे एक अभूतपूर्व इनोव्हेशन आहे, जे प्रत्येक UPI पेमेंटचे तत्काळ, बहुभाषी ऑडियो अलर्ट मेसेज देईल. त्यामुळे लहानतील लहान किराणा दुकानदार, भाजी विक्रेते आणि रस्त्याच्या कडेला खाण्य़ा-पिण्याचे व्यवसाय करण्या लोकांना सुविधा उपलब्ध होणार आहे. छोटे आणि लघु व्यापारी साउंड बॉक्ससाठी प्रत्येक महिन्याला जवळपास १२५ रुपये देतात, मात्र आता ही सेवा जिओसाउंडपे वर मोफत उपलब्ध असणार आहे. कारण, जिओभारत फोन वापर करणारे युजर दरवर्षी १,५०० रुपयांची बचत करू शकणार आहेत.
जिओभारत फोन जवळपास एक वर्षाच्या आधी लाँच केला होता. हा जगातील सर्वात स्वस्त 4G फ़ोन मानला जातो. याची किंमत केवळ ६९९ रुपये आहे. अशा प्रकारे कोणताही व्यापारी नवीन जिओभारत फ़ोन खरेदी करून केवळ ६ महिन्यात फोनची खेरदी किंमत वसूल करू शकतात. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्त जिओने जिओसाउंड पे वर आधुनिक संगीत असलेली वंदे मातरमच्या धून सादर केल्या आहेत.
जिओचे प्रेसिडेंट सुनील दत्त यांनी सांगितले की, जिओ प्रत्येक भारतीयाला सशक्त बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ उठवण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिओभारत फोनमध्ये मोफत जिओसाउंड पे सुविधा आणि वंदे मातरमच्या भावपूर्ण सादरीकरणासोबतच आम्ही भारतीय भावनेचा जल्लोष करत आहे. खऱ्या अर्थाने डिजिटल भारताच्या निर्माणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
संबंधित बातम्या