5G नेटवर्कमध्ये Jio फास्ट की Airtel? लेटेस्‍ट रिपोर्टमध्ये झाला खुलासा, Vi अन् BSNL ची स्थिती काय?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  5G नेटवर्कमध्ये Jio फास्ट की Airtel? लेटेस्‍ट रिपोर्टमध्ये झाला खुलासा, Vi अन् BSNL ची स्थिती काय?

5G नेटवर्कमध्ये Jio फास्ट की Airtel? लेटेस्‍ट रिपोर्टमध्ये झाला खुलासा, Vi अन् BSNL ची स्थिती काय?

Updated Oct 18, 2024 09:00 PM IST

देशात ५जी कव्हरेज क्षेत्रात रिलायन्स जिओने आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. ओपन सिग्नलच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार ५जी नेटवर्क कॅटेगरीमध्ये जिओने ६६.७ टक्के गुण मिळवले आहेत.

5G नेटवर्कमध्ये Jio फास्ट की Airtel? 
5G नेटवर्कमध्ये Jio फास्ट की Airtel? 

jio wins in 5g coverage and download speed : जिओने पुन्हा एका मैलाचा दगड पार केला आहे. जिओने तीन प्रमुख क्षेत्रांवर वर्चस्व राखले आहे. नेटवर्क गती, कव्हरेज आणि सेवांमध्ये सातत्य यामध्ये जिओ अव्वल ठरले आहे. भारताच्या दूरसंचार उद्योगात जिओने अन्य कंपन्यांना मागे टाकले आहे.

भारतात ५ जी मोबाईल नेटवर्ट रोलआउट करण्यात जिओ (Jio) आणि एअरटेल (Airtel) सर्वात पुढे आहेत. दोन्ही कंपन्यांचा दावा आहे की, त्यांचे नेटवर्क सर्वात गतिमान आणि विस्तारीत आहे. ताज्या रिपोर्टमध्ये यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ओपन सिग्नलच्या लेटेस्‍ट रिपोर्टमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये या कंपन्यांची तुलना केली गेली. यामध्ये काही बाबींमध्ये जिओ पुढे आहे तर काहींमध्ये एअरटेलने बाजी मारली आहे. ओवरऑल डाउनलोड स्‍पीड एक्‍सपीरियन्समध्ये जिओ नंबर वन ठरली आहे. तर ओवरऑल अपलोड स्‍पीड एक्‍सपीरियन्समध्ये एअरटेल विजयी ठरले आहे. ५G अपलोड आणि डाउनलोड स्‍पीडमध्ये एअरटेल जिओच्या पिछाडीवर पडले आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, व्हाडो- आयडिया आणि बीएसएनएल कोणत्याच कॅटेगरीमध्ये पुढे नाही. एकूण १४ बाबी तपासल्या गेल्या त्यामध्ये अधिक क्षेत्रात एअरटेल, जिओने बाजी मारली आहे.   

झी एन्टरटेनमेंटच्या नफ्यात ७० टक्के वाढ; कंपनीच्या शेअरची जोरदार उसळी, पण पुढं काय?

ओपन सिग्नलने मोबाइल एक्‍सपीरियन्स अवॉर्ड्स २०२४ च्या नावाने एक रिपोर्ट प्रसिद्ध केली आहे. यामध्ये मुख्‍यरित्या ४ कॅटेगरी आहेत. पहिली कॅटेगरी ‘ओव्हरऑल एक्‍सपीरियन्स' ची आहे. रिपोर्टनुसार व्हिडिओ एक्‍सपीरियन्समध्ये एअरटेल पुढे आहे. लाइव्ह व्हिडिओ एक्‍सपीरियन्स, गेम एक्‍सपीरियन्स आणि अपलोड स्‍पीड एक्‍सपीरियन्समध्ये एअरटेल पुढे आहे तर डाउनलोड स्‍पीड एक्‍सपीरियन्समध्ये जिओ नंबर वन आहे. 

दुसरी कॅटेगरी आहे ५G एक्‍सपीरियन्सची आहे. यामध्ये ५५ व्हिडिओ एक्‍सपीरियन्समध्ये एअरटेल पुढे आहे. ५G लाइव्ह व्हिडिओ एक्‍सपीरियन्स, 5G गेम्‍स एक्‍सपीरियन्स, ५G डाउनलोड आणि ५G अपलोड एक्‍सपीरियन्समध्येही एअरटेल पुढे आहे. 

देशात ५जी कव्हरेज क्षेत्रात रिलायन्स जिओने आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. ओपन सिग्नलच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार ५जी नेटवर्क कॅटेगरीमध्ये जिओने ६६.७ टक्के गुण मिळवले आहेत. जिओला एअरटेलच्या तुलनेत ४२ टक्के अधिक गुण मिळाले आहेत. एअरटेलचा स्कोर २४.४ टक्के आहे. हा स्कोर थेट ५जी कव्हरेजशी जोडले जाऊ शकते. ५जी च्या विस्तारीत सेवेमुळे जिओ ५जी  यूजर्स जवळपास दोन-तृतीयांश वेळ ५G शी कनेक्ट राहतात. दुसरीकडे कमी ५जी कव्हरेजमुळे एअरटेल यूजर्संना केवळ एक-चतृथांश वेळ ५जी वर घालवतात.

डाउनलोड स्पीड एक्सपीरियन्स कॅटेगरीमध्येही जिओ नंबर वन -

डाउनलोड स्पीड एक्सपीरियन्स कॅटेगरीमध्येही जिओचे प्रदर्शन शानदार राहिले. जिओ यूजर्संना एकूण सरासरी डाउनलोड स्पीड जवळपास ८९.५Mbps मिळाले. जे एअरटेलच्या ४४.२Mbps हून दुप्पट आहे. १६.९Mbps च्या स्कोरने व्होडाफोन-आयडिया तिसऱ्या नंबरवर आहे. तर बीएसएनएल ३.१ Mbps सोबत सर्वात तळाला आहे. इंटरनेट सर्फिंग, मोठी व हेवी फाइल डाउनलोड करणे, व्हिडिओ पहाणे आणि म्यूझिक ऐकण्यासाठी डाउनलोड स्पीड महत्वाची आहे.

ओव्हरऑल कव्हरेजमध्ये जिओ पुढे -

ओवरऑल कवरेज एक्सपीरियन्सच्या कॅटेगरीमध्येही रिलायन्स जिओ पुढे आहे. १० पैकी ९ अंक मिळवून जिओने कव्हरेज एक्सपीरियन्स अवार्ड जिंकले आहे. ७.१ अंक मिळवून एअरटेल दुसऱ्या नंबरवरती आहे. त्याचबरोबर ३.७ अंकांनी व्हीआय तिसऱ्या नंबरवरती आहे. बीएसएनएल १.२ अंक मिळवून शेवटच्या स्थानावर आहे. स्टेबल कनेक्शन किंवा कन्सिस्टेंसी बाबतही जिओ नंबर वन वर आहे. यामध्ये  एअरटेलच्या ६३.३ टक्केच्या तुलनेत जिओने ६६.५ अंक मिळवले आहे.

Whats_app_banner