जिओ ग्राहकांना खूशखबर! २०० पेक्षा कमी रुपयांत १० ओटीटी प्लॅटफॉर्मचा अ‍ॅक्सेस आणि बरंच काही
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  जिओ ग्राहकांना खूशखबर! २०० पेक्षा कमी रुपयांत १० ओटीटी प्लॅटफॉर्मचा अ‍ॅक्सेस आणि बरंच काही

जिओ ग्राहकांना खूशखबर! २०० पेक्षा कमी रुपयांत १० ओटीटी प्लॅटफॉर्मचा अ‍ॅक्सेस आणि बरंच काही

Nov 13, 2024 02:19 PM IST

jio plan : जीओ ग्राहकांना २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक ओटीटी सेवांचा अ‍ॅक्सेस देणारा प्रीपेड प्लॅन रिलायन्स जिओकडून जाहीर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये एक्स्ट्रा डेटाही ग्राहकांना मिळणार आहे.

जीओ वापरणाऱ्यांसाठी खुशखबरी! २०० पेक्षा कमी रुपयांत मिळणार १० ओटीटी प्लॅटफॉर्म एकदम फ्री
जीओ वापरणाऱ्यांसाठी खुशखबरी! २०० पेक्षा कमी रुपयांत मिळणार १० ओटीटी प्लॅटफॉर्म एकदम फ्री

jio plan : रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी विविध ऑफर आणल्या आहेत. जीओचे भारतात सर्वाधिक सब्सक्राइबर असून त्यांच्यासाठी जीओने अनेक प्रीपेड प्लान बाजारात आणले आहेत.  यातील काही  प्लॅनमध्ये ओटीटी सर्व्हिसेसचे कॉम्प्लिमेंटरी सब्सक्रिप्शन ग्राहकांना दिले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत कंपनी १० ओटीटी सेवांचा कंटेंट पाहण्याचा पर्याय ग्राहकांना देत आहे. हा ओटीटी प्लॅन इतर प्लॅन्सपेक्षा चांगला का आहे याची माहिती घेऊयात. 

जर तुम्हाला सोनीलिव्ह किंवा झी ५सारख्या लोकप्रिय ओटीटीवर कंटेंट पाहायचा असेल तर तुम्हाला सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह प्लॅन संपण्याची वाट पाहावी लागणार नाही. जिओच्या स्वस्त ओटीटी प्लॅनला कंपनीने जिओ टीव्ही प्रीमियम लाइनअपचा भाग बनवले आहे. या प्लॅनमध्ये एक्स्ट्रा डेटा बेनिफिट देखील ग्राहकांना मिळणार आहे  आणि सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह प्लॅनसोबत रिचार्जही करता येणार आहे.  

स्वस्तात १० ओटीटी सेवा असलेला जिओ प्लॅन

रिलायन्स जिओच्या ज्या प्लानचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे, त्याची  किंमत १७५ रुपये आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची असून यात १० जीबी डेटा मिळणार आहे.  केवळ डेटा पॅक असल्याने रिचार्जवर कॉलिंग किंवा एसएमएसचे फायदे मिळत नाहीत. वैधतेच्या कालावधीसाठी १० ओटीटी सेवांचा कंटेंट पाहण्याचा पर्याय यात देण्यात आला आहे.  

या प्लॅनमधून रिचार्ज केल्यावर ग्राहकांना  सोनीलिव्ह, झी ५, जिओसिनेमा प्रीमियम, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सन एनएक्सटी, कांचा लंका, प्लॅनेट मराठी, चौपाल आणि होईचोई आदीं ओटीटी प्लॅनफॉर्मचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे.  मायजिओ खात्यात जमा झालेल्या कूपनद्वारे जिओसिनेमा प्रीमियमचा कंटेंट पाहता येणार आहे. याशिवाय उर्वरित अ‍ॅप्स जिओ टीव्ही मोबाइल अ‍ॅपचा भाग आहेत.

ज्यांना ओटीटी कंटेंट पाहायचा आहे पण आपला सध्याचा अ‍ॅक्टिव्ह प्लॅन बदलायचा नाही त्यांच्यासाठी स्वस्त प्लॅन बेस्ट आहे. याशिवाय अचानक अतिरिक्त डेटाची गरज भासली तरी त्यांना रिचार्ज करता येणार आहे. 

Whats_app_banner