एका रिचार्जमध्ये नेटफ्लिक्स, प्राईम आणि डिज्नीसह १५ ओटीटी फ्री; जिओ फायबरचा धमाकेदार प्लान
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  एका रिचार्जमध्ये नेटफ्लिक्स, प्राईम आणि डिज्नीसह १५ ओटीटी फ्री; जिओ फायबरचा धमाकेदार प्लान

एका रिचार्जमध्ये नेटफ्लिक्स, प्राईम आणि डिज्नीसह १५ ओटीटी फ्री; जिओ फायबरचा धमाकेदार प्लान

Published Feb 03, 2024 05:53 PM IST

Jio Fiber Recharge: जिओ फायबरच्या या पोस्ट पेड प्लानमध्ये ग्राहकांना बऱ्याच गोष्टी मिळत आहेत.

Reliance JIO
Reliance JIO (REUTERS)

JioFiber Postpaid Plans: देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे ४४ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी नेहमीच नवनवीन प्लान आणत असते. कंपनीने ग्राहकांसाठी जिओ फायबरचा असाच एक प्लान आणला आहे, ज्यात नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम आणि डज्नी प्लस हॉटस्टार यासह एकूण १५ ओटीटी प्लानचे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे. या व्यतिरिक्त हा प्लॅन जलद इंटरनेट स्पीडसह अमर्यादित कॉलिंग आणि ५५० हून अधिक टीव्ही चॅनेल मोफत पाहता येत आहेत.

जिओ फायबरच्या १ हजार ४९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये ग्राहकांना ३०० एमबीपीएससह अमर्यादित डेटा आणि अमर्यादित व्हॉईस कॉल देखील मिळत आहे. कॉलिंगसाठी, कंपनी एक लँडलाइन कनेक्शन प्रदान करते, ज्यासाठी ग्राहकाला स्वतः लँडलाइन इन्स्ट्रुमेंट खरेदी करावे लागते. याशिवाय, या प्लानमध्ये ग्राहकांना ५५०+ टीव्ही चॅनेल मोफत पाहायला मिळतात.

Samsung Galaxy S24: मेड इन इंडिया आणि एआय फीचर्स असलेला सॅमसंग गॅलेक्सी एस२४ सीरिज विक्रीसाठी उपलब्ध

जिओ फायबरच्या या प्लानमध्ये ग्राहकांना १५ ओटीटी सबस्क्रिप्शन मोफत मिळते. ज्यात Netflix, Amazon Prime, Disney+ Hotstar, Sony Liv, ZEE5, JioCinema, Sun NXT, Hoichoi, Discovery+, ALTBalaji, Eros Now, Lionsgate Play, ShemarooMe, DocuBay आणि EPICON यांचा समावेश आहे.

अवघ्या ११ हजारांत आयफोनसारखा लूक आणि २५६ जीबी स्टोरेज; इन्फिनिक्सच्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा

ग्राहक हा प्लान मासिक पर्यायासह तीन, सहा किंवा १२ महिन्यासाठी घेऊ शकतात. तीन महिन्यांच्या प्लानची किंमत ४ हजार ४९७ रुपये आहे, सहा महिन्याच्या प्लानची किंमत ८ हजार ९९४ रुपये इतकी आहे. तर, १२ महिन्याच्या प्लानची किंमत १७ हजार ९८८ रुपये आहे. सहा महिन्याच्या प्लानमध्ये ग्राहकांना १५ दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते. तर, १२ महिन्याच्या प्लानमध्ये ग्राहकांना ३० दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते. अधिक माहितीसाठी ग्राहक जिओच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

Whats_app_banner