What Is Jio Phone Call AI: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी गुरुवारी (२९ ऑगस्ट २०२४) कंपनीच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओ फोनकॉल एआय फीचर लॉन्च केले. यामुळे अनेक गोष्टी सोप्या होणार आहेत. जिओ फोनकॉल एआय फीचरच्या मदतीने कॉल रेकॉर्डिंग, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सक्राइब म्हणजेच कॉल्सचे टेक्स्टमध्येही रुपांतर करता येणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या नव्या फीचरची घोषणा करताना रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे चेअरमन आकाश अंबानी म्हणाले की, 'जिओ फोनकॉल एआय जिओ फीचर्समुळे कोणताही कॉल रेकॉर्ड आणि सेव्ह करू शकतो आणि ते ट्रान्सक्रिप्ट करू शकतो म्हणजेच व्हॉईसचे रूपांतर मजकुरात करू शकतो.' हे फीचर्स पर्सनल आणि ग्रुप कॉल दोन्हीकडे काम करेल.
जिओ फोनकॉल एआय फीचर वापरणे खूप सोपे असेल. जिओ एक नंबर जारी करेल, तो आपल्या फोनमध्ये सेव्ह करावा लागेल. कॉल येताच जिओ फोनकॉल एआय वापरकर्त्याला एक मॅसेज येईल. कॉल रेकॉर्ड करण्यासाठी वापरकर्त्याला '१' या क्रमांकावर क्लिक करावे लागेल. वापरकर्त्याला कॉल रेकॉर्ड करायचा नसेल तर त्यांनी '२' या क्रमांकावर क्लिक करावे. '३' या क्रमांकावर क्लिक केल्यानंतर कॉल रेकॉर्डिंग बंद होईल. रिलायन्स जिओने जिओच्या वेलकम ऑफर अंतर्गत आपल्या युजर्सला १०० जीबी फ्री क्लाऊड स्टोरेज प्रायव्हसी आणि सिक्युरिटी फीचर्स देण्याची घोषणा केली आहे. जिओ क्लाउडमध्ये युजर्स फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स स्टोअर करू शकतात.
रिलायन्स जिओच्या टीव्ही प्रीमियम प्लॅन्ससोबत एकाच वेळी अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म आनंद लुटता येणार आहे. जिओचा १७५ रुपयांचा टीव्ही प्रीमिअम प्लान हा केवळ डेटा- ओनली प्लॅन असून २८ दिवसांच्या वैधतेसह या रिचार्जवर १० जीबी अतिरिक्त डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना सोनीलिव्ह, झी 5, जिओसिनेमा प्रीमियम, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सनएनएक्सटी, कांचा लांका, प्लॅनेट मराठी, चौपाल, होईचोई आणि जिओ टीव्ही यांची ओटीटी सेवा मोफत मिळते.