मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jio vs Airtel: जिओचा एअरटेलला धक्का; २३९ रुपयांत मिळणार भरमसाठ डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Jio vs Airtel: जिओचा एअरटेलला धक्का; २३९ रुपयांत मिळणार भरमसाठ डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 27, 2024 10:45 AM IST

Under ₹250 Recharge Plans: रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या २५० पेक्षा कमी किंमतीच्या प्लानबाबत जाणून घेऊयात.

Reliance JIO
Reliance JIO (REUTERS)

Jio Vs Airtel: कमी पैशात चांगला रिचार्ज प्लान शोधणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दरम्यान, रिलायन्स जिओ आणि एअरटेल च्या २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्ज प्लानमध्ये भरमसाठ डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळते. या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांच्या वैधतेसह दररोज १.५ जीबी डेटा आणि बऱ्याच सुविधा मिळतात. जिओ आणि एअरटेलच्या २५० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्लानबद्दल जाणून घेऊयात.

एअरटेलचा १७९ रुपयांचा प्लान

एअरटेलदेखील जिओप्रमाणे १७९ रुपयांचा प्लॉन ऑफर करते. हा प्लान कॉलिंगसाठी लॉन्च करण्यात आला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण २ जीबी डेटा, ३०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता मिळते. याशिवाय, अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळते.

एअरटेलचा २३९ रुपयांचा प्लान

जिओप्रमाणे एअरटेलचा देखील २३९ रुपयांचा प्लान आहे. ज्यामध्ये ग्राहकांना २४ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये ग्राहकांना १ जीबी दैनिक डेटा, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉल ऑफर करते. महत्त्वाचे म्हणजे, एअरटेलचे दोन्ही प्लानमध्ये अमेझॉन प्राइम मोबाइल एडीशन सबस्क्रिप्शनसह येतात.

जिओचा १७९ रुपयांचा प्लान

जिओचा १७९ रुपयांचा प्लानमध्ये २४ दिवसांची वैधता मिळते. याशिवाय, या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १०० एसएमएससोबत १जीबी दैनिक डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलची सुविधा देते.

जिओचा २३९ रुपयांचा प्लान

या प्रीपेड प्लाasjwनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते. या व्यतिरिक्त कंपनी या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉल सुविधेसह दररोज १०० एसएसएस देखील देत आहे.

एअरटेल आणि जिओच्या २३९ रुपयांच्या प्लानमध्ये जिओ एअरटेलपेक्षा जास्त फायदे मिळतात. जिओच्या २३९ रुपयांच्या प्लानमध्ये एअरटेलपेक्षा १८ जीबी जास्त डेटा मिळत आहे. दोन्ही कंपनीच्या १७९ प्लानमध्ये एअरटेलचा प्लान अधिक फायदेशीर आहे. जिओच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. तर, एअरटेलच्या १७९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळतो.

WhatsApp channel

विभाग