Bonus Shares News in Marathi : बीसी जिंदाल समूहाची कंपनी जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेडनं नव्या वर्षात आपल्या शेअरहोल्डर्सना मोठी भेट दिली आहे. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेडनं आपल्या गुंतवणूकदारांना ४:१ या प्रमाणात बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक एका शेअरमागे ४ बोनस शेअर्स दिले जाणार आहेत. या घोषणेमुळं कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे.
स्मॉलकॅप कंपनी जिंदाल वर्ल्डवाइडचा शेअर बुधवारी बीएसईवर ४ टक्क्यांहून अधिक वधारून ४७०.९५ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअरनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा शेअर १.१८ टक्क्यांनी वाढून ४५०.२५ रुपयांवर व्यवहार करत होता.
गेल्या पाच वर्षांत जिंदाल वर्ल्डवाइडचे शेअर्स ६५० टक्क्यांनी वधारले आहेत. १० जानेवारी २०२० रोजी कंपनीचा शेअर ६२.७० रुपयांवर होता. आज ८ जानेवारी २०२५ रोजी हा शेअर ४७०.९५ रुपयांवर पोहोचला. तर, गेल्या ४ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ६९० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स ५८ रुपयांवरून ४७० रुपयांपर्यंत वधारले आहेत. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेडच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २६८ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ९००० कोटी रुपयांच्या पुढं गेलं आहे.
गेल्या १० वर्षांत जिंदाल वर्ल्डवाइडचे शेअर्स ४००० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. ८ जानेवारी २०१५ रोजी कंपनीचा शेअर ११.१४ रुपयांवर होता. तो आज ४७०.९५ रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर जिंदाल वर्ल्डवाइडच्या शेअरमध्ये गेल्या दोन महिन्यांत ५५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड ही १८,००० कोटी रुपयांच्या बीसी जिंदाल समूहाचा भाग आहे. पश्चिम बंगालमध्ये कंपनीचे दोन कारखाने आहेत. जिंदाल भारतीय बाजारपेठेव्यतिरिक्त भारत, लॅटिन अमेरिका आणि इतर अनेक देशांना पोलाद उत्पादनांची निर्यात करतात.
संबंधित बातम्या