JEE Mains Results 2025 : जेईई मेन्सचा निकाल लवकरच जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहाल?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  JEE Mains Results 2025 : जेईई मेन्सचा निकाल लवकरच जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहाल?

JEE Mains Results 2025 : जेईई मेन्सचा निकाल लवकरच जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहाल?

Published Feb 11, 2025 02:36 PM IST

JEE Mains Results 2025 : जेईई मेन्स २०२५ चा निकाल एनटीएच्या अधिकृत वेबसाइट पाहता येणार आहे. कसा पाहायचा जाणून घ्या!

JEE Mains Results 2025 : जेईई मेन्सचा निकाल लवकरच जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहाल?
JEE Mains Results 2025 : जेईई मेन्सचा निकाल लवकरच जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहाल?

JEE Mains Results 2025 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीए लवकरच जेईई मेन्स २०२५ चा निकाल जाहीर करणार आहे. संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य परीक्षा २०२५ सत्र १ ला बसलेले उमेदवार jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून आपला निकाल पाहू आणि डाउनलोड करू शकतील.

जेईई मेन्स २०२५ निकालाच्या अधिसूचनेबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली तरी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, पहिल्या सत्राचा निकाल १२ फेब्रुवारीपर्यंत जाहीर केला जाईल.

एनटीएनं याआधीच १० फेब्रुवारी २०२५ रोजी जेईई मेन्स २०२५ ची अंतिम 'अन्सर की' प्रसिद्ध केली आहे. यात जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील पेपर क्रमांक १ च्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये विचारले जाणारे १२ प्रश्न वगळण्यात आले होते. नियमानुसार एखादा प्रश्न वगळल्यास त्या प्रश्नाचे पूर्ण गुण सर्व उमेदवारांना दिले जाणार आहेत.

उमेदवारांना हरकती सादर करण्यासाठी प्रत्येक प्रश्नामागे २०० रुपये नॉन-रिफंडेबल फी भरावी लागत होती. हरकती नोंदविण्याची मुदत ६ फेब्रुवारी २०२५ रोजी संपली.

एनटीएनं जेईई मेन सत्र १ पेपर १ (बीई / बीटेक) २२, २३, २४, २८ आणि २९ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते ६ या दोन शिफ्टमध्ये आयोजित केले होते. त्याचप्रमाणे जेईई मेनचा (बीआर्क/बीप्लेनिंग) पेपर २ हा ३० जानेवारी रोजी दुपारी ३ ते ६.३० या वेळेत दुसऱ्या शिफ्टमध्ये घेण्यात आला होता.

निकाल लागल्यानंतर पहिल्या सत्राचे गुणपत्रक कसं तपासावं?

जेईई मेन्स २०२५ निकाल तपासण्यासाठी उमेदवार खालील प्रक्रियेचं अनुसरण करू शकतात.

> जेईई मेन्स २०२५ च्या jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 

> होम पेजवर, जेईई मेन्स २०२५ च्या पहिल्या सत्राच्या गुणपत्रक लिंकवर क्लिक करा. 

> आपले नोंदणीकृत क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करून लॉग इन करा. 

> आपला जेईई मेन्स २०२५ सत्र १ चा निकाल स्क्रीनवर दिसेल. 

> निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआऊट ठेवा.

> अधिक संबंधित माहितीसाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

Ganesh Pandurang Kadam

TwittereMail

गणेश कदम २०२२ पासून हिंदुस्तान टाइम्स- मराठीमध्ये सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत आहे. गणेश गेली २० वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून यापूर्वी लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, सामना या दैनिकांमध्ये काम केले आहे. राजकीय वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक राजकीय सभा, आंदोलने व विधीमंडळाची अधिवेशने कव्हर केली आहेत. २०१२ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारिता सुरू केली. गणेशला राजकारण, अर्थकारणाबरोबरच साहित्य व संगीत विषयक घडामोडींची विशेष आवड आहे.

Whats_app_banner