Share Split News : इलेक्ट्रिक बस बनविणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असेलल्या जेबीएम ऑटो लिमिटेडनं शेअरच्या विभाजनाची घोषणा केली आहे. त्यानुसार कंपनीचे शेअर्स २ भागांमध्ये विभागले जातील. कंपनीनं यासाठी रेकॉर्ड डेट देखील जाहीर केली आहे.
जेबीएम ऑटो लिमिटेडनं शेअर बाजारांना या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार २ रुपये अंकित मूल्य असलेल्या शेअरची २ भागांमध्ये विभागणी केली जाईल. या विभाजनानंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू १ रुपये प्रति शेअरपर्यंत खाली येईल. कंपनीनं या शेअर स्प्लिटसाठी ३१ जानेवारी २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच त्याच दिवशी कंपनी शेअर बाजारात एक्स-स्प्लिट ट्रेड करणार आहे.
जेबीएम ऑटो लिमिटेडनं यापूर्वी २०२२ मध्ये शेअर्सचं विभाजन केलं होतं. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सची अंकित किंमत प्रति शेअर ५ रुपयांवरून २ रुपयांपर्यंत खाली आली.
जेबीएम ऑटो लिमिटेडच्या गुंतवणूकदारांसाठी मागचं एक वर्ष खूपच धक्कादायक राहिलं आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत हा शेअर ३४ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी वर्षभर कंपनीचे शेअर्स घेऊन ठेवले आहेत, त्यांना आतापर्यंत सुमारे २४ टक्के तोटा सहन करावा लागला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी काल, १० जानेवारी रोजी जेबीएम ऑटो लिमिटेडचा शेअर १.६१ टक्क्यांनी घसरून १,४६८ रुपयांवर व्यवहार करत होता.
मागचं २०२४ हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी फारसं चांगलं नसेलही, मात्र २ वर्षांपासून शेअर होल्ड करून असलेल्यांना या शेअरनं १७६ टक्के नफा दिला आहे. तर, ५ वर्षात या इलेक्ट्रिक बस निर्मात्या कंपनीच्या शेअरची किंमत १२०० टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
संबंधित बातम्या