तिमाही निकालानंतर रॉकेटच्या वेगानं झेपावला जना स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर, खरेदी करावा की विकावा?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  तिमाही निकालानंतर रॉकेटच्या वेगानं झेपावला जना स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर, खरेदी करावा की विकावा?

तिमाही निकालानंतर रॉकेटच्या वेगानं झेपावला जना स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर, खरेदी करावा की विकावा?

Jan 22, 2025 11:35 AM IST

Jana Small Finance Bank Share Price : एकल निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर १७.९१ टक्क्यांची घट झाल्यानंतरही जना स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर रॉकेटसारखा झेपावला आहे.

तिमाही निकालानंतर रॉकेटच्या वेगानं झेपावला जना स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर, खरेदी करावा की विकावा?
तिमाही निकालानंतर रॉकेटच्या वेगानं झेपावला जना स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर, खरेदी करावा की विकावा?

Share Market News : जना स्मॉल फायनान्स बँकेच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर कंपनीच्या शेअरच्या किंमतीत १८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बँकेचा शेअर १८.५७ टक्क्यांनी वधारून ४३४.५० रुपयांवर पोहोचला. बँकेच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर घट होऊनही गुंतवणूकदारांनी बँकेचा शेअर घेण्यासाठी गर्दी केली आहे.

आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत जना स्मॉल फायनान्सच्या एकल निव्वळ नफ्यात १७.९१ टक्क्यांची घट झाली असून हा नफा ११०.६ कोटी रुपयांपर्यंत खाली आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो १३४.६ कोटी रुपये होता.

सप्टेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीतील ९६ कोटी रुपयांच्या तुलनेत निव्वळ नफ्यात १४.६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचं निव्वळ व्याज उत्पन्न (NII) ८ टक्क्यांनी वाढून ५९३ कोटी रुपये झालं आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत प्री-प्रोव्हिजनिंग ऑपरेटिंग नफा २७९ कोटी रुपयांवर आला आहे. आधीच्या वर्षी तो २९५ कोटी रुपये होता.

एनपीएमध्ये वाढ

३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सकल अनुत्पादक मालमत्ता (GNPA) २.८ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. एक वर्षापूर्वी ती २.१९ टक्के होती, तर निव्वळ अनुत्पादित मालमत्ता (NNPA) आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीतील ०.७१ टक्क्यांवरून ०.९४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

डिसेंबर तिमाहीअखेर व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) २७,९८४ कोटी रुपये होती. ही वाढ १९ टक्के आहे. एकूण मालमत्तेपैकी ६८ टक्के मालमत्ता सुरक्षित आहे.

कशी आहे शेअरची वाटचाल?

जना स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरचा भाव एका महिन्यात १२ टक्क्यांनी वधारला असला तरी सहा महिन्यांत हा शेअर ३९ टक्क्यांनी घसरला आहे. बँकेच्या शेअर १४ फेब्रुवारी २०२४ रोजी बीएसईवर ३९६ रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. आयपीओमधील ४१४ रुपये प्रति शेअर किंमतीच्या तुलनेत लिस्टिंग किंमत नकारात्मक होती. हा शेअर १९ जून २०२४ रोजी ७६०.८५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आणि २१ जानेवारी २०२५ रोजी तो ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ३६४.०० रुपयांवर पोहोचला.

आज १२.०५ वाजता बीएसईवर हा शेअर १९.०३ टक्क्यांनी घसरून ४३१.५० रुपयांवर शेअर करत आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner