IT Return : 'या' १० प्रकारच्या उत्पन्नावर लागत नाही इन्कम टॅक्स, रिटर्न फाइल करण्याआधी जाणून घ्या!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IT Return : 'या' १० प्रकारच्या उत्पन्नावर लागत नाही इन्कम टॅक्स, रिटर्न फाइल करण्याआधी जाणून घ्या!

IT Return : 'या' १० प्रकारच्या उत्पन्नावर लागत नाही इन्कम टॅक्स, रिटर्न फाइल करण्याआधी जाणून घ्या!

Jul 09, 2024 11:23 AM IST

Income Tax Return : इन्कम टॅक्स विवरणपत्र दाखल करण्याची तारीख जवळ येऊ लागल्यानं करदात्यांची लगबग सुरू झाली आहे. या घाईगडबडीत करदात्यांनी खालील गोष्टींकडं लक्ष द्यायला हवं.

ITR : 'या' १० प्रकारच्या उत्पन्नावर लागत नाही इन्कम टॅक्स, रिटर्न फाइल करण्याआधी जाणून घ्या!
ITR : 'या' १० प्रकारच्या उत्पन्नावर लागत नाही इन्कम टॅक्स, रिटर्न फाइल करण्याआधी जाणून घ्या!

ITR filing : प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख यंदा ३१ जुलै आहे. तुम्ही तुमचं विवरणपत्र भरण्याची तयारी करत असाल, तर कोणत्या उत्पन्नावर टॅक्स लागतो आणि कोणत्या उत्पन्नावर लागत नाही हे जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. ही माहिती घेतल्यास तुम्हाला विवरणपत्र योग्य रितीनं भरता येईल, शिवाय टॅक्सही वाचवता येईल.

खालील दहा प्रकारच्या उत्पन्नावर टॅक्स लागत नाही…

कृषी उत्पन्न

शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर प्राप्तिकरातून सूट आहे. ही सूट केवळ पिकांच्या विक्रीवरच नाही, तर शेतजमीन किंवा इमारतींचं भाडं आणि शेतजमीन खरेदी किंवा विक्रीतून मिळणारा नफा यावरही आहे.

NRE खात्यांमधून व्याज उत्पन्न

NRE (Non Resident External Account) खात्यातील ठेवींवर मिळणारे व्याज करमुक्त आहे. अनिवासी भारतीय देखील NRE खात्यांद्वारे त्यांच्या मूळ ठिकाणी पैसे हस्तांतरित करू शकतात.

ग्रॅच्युइटी

खाजगी क्षेत्रात सेवानिवृत्तीनंतर मिळमारी २० लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यावर इन्कम टॅक्स भरण्याची आवश्यकता नाही.

भांडवली नफा

काही प्रकारातील भांडवली नफा देखील करमुक्त असतो. शहरी शेतजमिनीच्या बदल्यात मिळणाऱ्या नफ्यावर प्राप्तिकर भरावा लागत नाही.

पार्टनरशीप फर्मचा नफा

प्राप्तिकर कायद्यानुसार, भागीदारी फर्मच्या उत्पन्नावर संस्था स्तरावर कर आकारला जातो. फर्मसाठी काम करणारे भागीदार प्राप्तिकर भरत नाहीत कारण त्यांना कर भरल्यानंतर उरणाऱ्या नफ्यातील वाटा मिळतो.

शिष्यवृत्ती

सरकारी आणि खासगी संस्थांकडून अभ्यासासाठी शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राप्तिकरातून सूट दिली जाते.

भविष्य निर्वाह निधी (Provident Fund)

भारतातील कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी ही अनिवार्य बचत योजना आहे. वयानुसार यात वाढ होते. ही बचत करमुक्त असते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना करमुक्त परतावा ऑफर करतो, मात्र त्यासाठी कर्मचाऱ्यानं ५ वर्षांपेक्षा जास्त काळ सक्रियपणे योगदान दिलं पाहिजे. या काळात त्यानं नोकरी बदलली तरी ही कर सवलत मिळते.

करमुक्त पेन्शन

UNO सारख्या काही संस्थांकडून मिळणारी पेन्शन करमुक्त असते. कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेल्यांना मिळणारं कौटुंबिक निवृत्ती वेतन देखील करमुक्त असते.

स्वेच्छानिवृत्ती

सेवानिवृत्तीपूर्वी स्वेच्छानिवृत्तीवर मिळणारी रक्कम ५ लाख रुपयांपर्यंत करमुक्त आहे. नातेवाइकांकडून किंवा लग्नाच्या निमित्तानं मिळालेल्या भेटवस्तूंनाही करातून सूट देण्यात आली आहे.

भत्ते किंवा कोणतीही भरपाई

भारतातील कोणत्याही व्यक्तीसाठी काही भत्ते करातून मुक्त आहेत. उदाहरणार्थ, परदेशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारत सरकारनं दिलेला परदेशी भत्ता करमुक्त आहे. याव्यतिरिक्त, सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती किंवा सेवानिवृत्तीवर मिळणारी रक्कम करमुक्त आहे.

Whats_app_banner