मराठी बातम्या  /  Business  /  Itr Filing Last Date Jul 31 For Fy 2022 23 Income Tax Return Late Fee Details

ITR filing deadline : आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी आयकर भरण्याची अंतिम मुदत जाहीर,वेळेत आयकर भरा अन्यथा....

ITR filing HT
ITR filing HT
Kulkarni Rutuja Sudeep • HT Marathi
May 10, 2023 06:48 PM IST

ITR filing deadline : : आयकर विभागाने करदात्यांना 2022-23 या वर्षासाठी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख जाहीर केली आहे.

ITR filing deadline : आयकर विभागाने करदात्यांना २०२२-२३ या वर्षासाठी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख जाहीर केली आहे. विभागाने आयटीआरशी संबंधित काही फॉर्म देखील जारी केले आहेत. वार्षिक ३ लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांनी आयटीआर भरावा. कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना वेळेवर आयटीआर फाइल करण्यास मदत करण्यासाठी वेळेपूर्वी फॉर्म -१६ जारी करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

सध्या करदात्यांना आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कमावलेल्या उत्पन्नासाठी रिटर्न दाखल करावे लागेल. आयटीआर भरून तुम्ही तुमची गुंतवणूक आणि कमाई सरकारला घोषित करतात. यावेळी आयटीआर फायली दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ निश्चित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत करदात्यांनी आयटीआरशी संबंधित सर्व कागदपत्रे गोळा करणे आत्ताच सुरू केले पाहिजे.

आयटीआर दाखल करण्याची प्रवर्गानुसार शेवटची तारीख

- वैयक्तिक करदाते, एचयूएफ, एओपी, बीओआय किंवा ज्यांच्या अकाउंट बुक्सचे ऑडिट करणे आवश्यक नाही त्यांच्यासाठी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ आहे.

- ज्या व्यवसायांचे अकाऊंट्स बूक ऑडिट करणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ आहे.

- ज्या व्यवसायांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यवहार किंवा विशिष्ट देशांतर्गत व्यवहार आहेत त्यांना रिटर्न भरण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२३ ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.

- सुधारित आयटीआर आणि विलंबित रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ निश्चित करण्यात आली आहे.

आयटीआर विलंब शुल्क आणि दंड

जर करदात्यांनी विहित शेवटच्या तारखेनंतर त्यांचे विवरणपत्र भरले तर त्यांना कलम २३४ए अंतर्गत न भरलेल्या कराच्या रकमेवर दरमहा १ टक्के दराने व्याज द्यावे लागेल. त्याच वेळी, कलम २३४ एफ अंतर्गत, करदात्यांना देय तारीख चुकवल्याबद्दल विलंब शुल्क म्हणून ५ हजार रुपये भरावे लागतील. दुसरीकडे, जर करदात्यांची एकूण मिळकत ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर ही विलंब फी १००० रुपये भरावी लागेल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग