Itel S25 Ultra : ३२ एमपी सेल्फी कॅमेरा, ५ हजार एमएएच बॅटरी; बजेट सेगमेंटमध्ये धमाकेदार फोन येतोय बाजारात!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Itel S25 Ultra : ३२ एमपी सेल्फी कॅमेरा, ५ हजार एमएएच बॅटरी; बजेट सेगमेंटमध्ये धमाकेदार फोन येतोय बाजारात!

Itel S25 Ultra : ३२ एमपी सेल्फी कॅमेरा, ५ हजार एमएएच बॅटरी; बजेट सेगमेंटमध्ये धमाकेदार फोन येतोय बाजारात!

Nov 05, 2024 06:51 PM IST

Itel S25 Ultra Price in India: लवकरच आयटेल कंपनीचा बजेट स्मार्टफोन आयटेल एस २५ अल्ट्रा 4G अधिकृतपणे लॉन्च करणार आहे.

लॉन्चिंगपूर्वीच आयटेल एस २५ अल्ट्राचे फीचर्स लीक!
लॉन्चिंगपूर्वीच आयटेल एस २५ अल्ट्राचे फीचर्स लीक!

देशांतर्गत टेक कंपनी आयटेल लवकरच बजेट सेगमेंटमध्ये आयटेल एस २५ अल्ट्रा 4G अधिकृतपणे लॉन्च करणार आहे. पण त्याआधी मार्केटिंग इमेजेसच्या माध्यमातून फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि डिझाइनसंबंधित माहिती लीक झाली आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. आयटेल एस २५ अल्ट्रा 4G मध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा युनिट आणि डिस्प्लेवर होल पंच कटआऊट देण्यात आला आहे. यात युनिसॉक टी ६२० प्रोसेसर असून ८ जीबीपर्यंत रॅम देण्यात आला आहे. आयटेल एस २५ अल्ट्रा 4G मध्ये १८ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली, असे बोलले जात आहे. मात्र, याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

टिप्सटर पारस गुगलानी (@passionategeekz) ने आयटेल एस २५ अल्ट्राबाबत माहिती शेअर केली आहे, ज्यात या फोनमध्ये मिळणारे फीचर्स आणि डिझाइन पाहायला मिळत आहे. टिप्सटरचा दावा आहे की, भारतात या 4G हँडसेटची किंमत १५ हजारांपेक्षा कमी असेल. इतर मार्केटमध्ये याची किंमत १३ हजार ५०० रुपयांपर्यंत असू शकते.

आयटेल एस २५ अल्ट्रा डिझाइन

आयटेल एस २५ अल्ट्रा होल पंच डिस्प्ले डिझाइनसह ब्लॅक, ब्लू आणि टायटॅनियम रंगात येतो. हँडसेटच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात ट्रिपल रियर कॅमेरा युनिट आहे. या फोनचा मागील भाग सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रासारखा असेल.

आयटेल एस २५ अल्ट्रा स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

लीक्सनुसार, आयटेल एस २५ अल्ट्रामध्ये ६.७८ इंचाचा थ्रीडी कर्व्ड एमोलेड डिस्प्ले असेल. फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १४०० निट्स पीक ब्राइटनेस असेल. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह युनिसॉक टी६२० चिपसेट सोबत येणार आहे. फोनमध्ये १६ जीबीपर्यंत रॅम मिळेल. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा असेल. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. आयटेल एस २५ अल्ट्रामध्ये १८ वॅट चार्जिंग सपोर्टसह ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची रुंदी ६.९ मिमी आणि वजन १६३ ग्रॅम असू शकते. आयटेल एस २५ अल्ट्रा आयपी ६४- रेटेड बिल्डसह येते. या फोनमध्ये ६० महिन्यांचे फ्लुएंसी सर्टिफिकेटही देण्यात आले आहे.

Whats_app_banner