itel Flip 1 launched In India: भारतीय बाजारात अनेक फ्लिपफोन उपलब्ध आहेत. मात्र, त्यांची किंमत परवडणारी नसल्याने अनेकजण त्याकडे पाठ फिरवतात. नुकताच आयटेल कंपनीने त्यांचा प्लिप फोन लॉन्च केला आहे, ज्याची किंमत ऐकून अनेकांना आनंदाचा धक्का बसला आहे. हा जगातील सर्वात स्वस्त फ्लिप असेल, असे बोलणे वावगे ठरणार नाही. सध्या बाजारात उपलब्ध असलेले बजेट स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ५०००-१०००० मोजावे लागतात. परंतु, आयटेलने हा फोन अवघ्या २ हजार ४९९ रुपयांत लॉन्च केला आहे. आयटेलने लॉन्च केलेला हा फोन कीपॅड फ्लिप फोन असला तरी तो दिसायला सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ६ सारखाच आहे.
आयटेल फ्लिप १ फोनमध्ये २.४ इंचाचा ओव्हीजीए डिस्प्ले मिळत आहे.फोन ग्लास फिनिशसह येतो. कीपॅडच्या वर तुम्हाला स्वाक्षरीचे स्वरूप दिसेल. या फोनमध्ये मागील वीजीए कॅमेरा आहे. हा कमी वजनाचा फोन मजबूत बॅटरीच्या दाव्यासह येतो. हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर सात दिवस चालतो. फोनमध्ये १२०० एमएएच बॅटरी आहे.
इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये किंगव्हाईस फीचर देण्यात आले आहे. या फोनमध्ये १३ भाषांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आपण आपली आवडती भाषेचा आनंद घेऊ शकतात. ब्लूटूथ कॉल सपोर्टसह येणारा हा फोन चांगला फोटो क्लिक करू शकेल. यासोबत टाईप सी पोर्ट चार्ज उपलब्ध आहे. हा फोन ग्लास-डिझाइन केलेल्या कीपॅडसह येतो.
आयटेलने जेन-झेडगरजा पूर्ण करण्यासाठी आणि अनेक वैशिष्ट्ये प्रदान करण्यासाठी नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला. आयटेल एस २४ स्मार्टफोन २३ एप्रिल २०२४ रोजी लॉन्च करण्यात आला. आयटेल एस २४ मध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.६ इंचाचा एचडी+ पंच-होल डिस्प्ले आहे. यात 'डायनॅमिक बार' फीचर देण्यात आले आहे, ज्यामध्ये बॅटरी चार्जिंग डिटेल्स, इनकमिंग कॉल अलर्ट आणि बरेच काही आहे. डिव्हाइसचे मुख्य आकर्षण म्हणजे याचा कॅमेरा आहे ज्यात सॅमसंग एचएम ६ आयसोसेल सेन्सरसह १०८ एमपी अल्ट्रा-क्लिअर ड्युअल एआय कॅमेरा आणि एफ/ १.६ अपर्चर आहे. फोनच्या फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. आयटेल एस २४ मध्ये मीडियाटेक हेलियो जी ९१ ऑक्टा-कोर प्रोसेसरसह ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. स्मार्टफोनमध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या