सेल लागलाय! अवघ्या ८,४९९ रुपयांत मिळतोय १६ जीबी रॅम आणि १०८ एमपी कॅमेरावाला तगडा फोन
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  सेल लागलाय! अवघ्या ८,४९९ रुपयांत मिळतोय १६ जीबी रॅम आणि १०८ एमपी कॅमेरावाला तगडा फोन

सेल लागलाय! अवघ्या ८,४९९ रुपयांत मिळतोय १६ जीबी रॅम आणि १०८ एमपी कॅमेरावाला तगडा फोन

Nov 21, 2024 06:12 PM IST

itel S24 Sale marathi news : आयटेल डेज सेल पुन्हा एकदा सुरू झाला असून तो २७ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला सर्व Itel स्मार्टफोन्सवर भरघोस सूट मिळत आहे.

सेल लागलाय! अवघ्या ८,४९९ रुपयांत १६ जीबी रॅम आणि १०८ एमपी कॅमेरावाला तगडा फोन
सेल लागलाय! अवघ्या ८,४९९ रुपयांत १६ जीबी रॅम आणि १०८ एमपी कॅमेरावाला तगडा फोन

itel S24 Sale : दणदणीत फीचर्स असलेल्या, पण तरीही खिशाला परवडणाऱ्या स्मार्टफोनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. अ‍ॅमेझॉनवर पुन्हा एकदा itel Days सेल सुरू झाला आहे. येत्या २७ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये भरघोस सूट दिली जात आहे.

या सेलमध्ये १०८MP कॅमेरा असलेला फोन स्वस्तात मिळत आहे. सर्व Itel स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळत आहे. सेलमध्ये itel S24 वरही चांगली सूट दिली जात आहे. itel S24 ची खासियत म्हणजे 16 GB RAM (8 GB रिअल + 8 GB व्हर्च्युअल) आणि 108 MP कॅमेरा.

आयटेल सेलमधील ऑफर व सवलतींचा सविस्तर तपशील

१०८MP कॅमेरा सह itel S24 वर मोठी सूट

Itel S24 कंपनीनं ९९९९ रुपयांना लॉन्च केला आहे. itel Days Sale मध्ये १५०० रुपयांच्या थेट सवलतींनंतर तो ८४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सेलमध्ये या फोनवर १ हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट देण्यात येत आहे.

जर तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करून खरेदी करायचा असेल तर तुम्हाला ७००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत ही तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँडवर अवलंबून असेल हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

itel S24 ची वैशिष्ट्ये

itel च्या या फोनमध्ये 6.6 इंच HD+ डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले ९०Hz च्या रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. कंपनी फोनमध्ये ८ जीबी हार्डवेअरसह ८ जीबी व्हर्च्युअल रॅम देखील देत आहे. यामुळं फोनची एकूण रॅम १६ GB पर्यंत होते. फोन 128 GB इंटरनल स्टोरेजसह येतो. हा फोन Android १३ वर आधारित itel OS १३ वर काम करतो.

MediaTek Helio G91 चिपसेट itel S24 फोनमध्ये दिसेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे दिले आहेत. यात १०८ मेगापिक्सल्सची मुख्य लेन्स आहे. फोनच्या पुढील बाजूस सेल्फीसाठी तुम्हाला ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा पाहायला मिळेल. फोनमध्ये ५०००mAh बॅटरी आहे. ही बॅटरी १८W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Whats_app_banner