मराठी बातम्या  /  बिझनेस  /  itel: फक्त ८ हजारांत २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम मिळणार; आयटेलच्या फोनचा बाजारात धुमाकूळ!

itel: फक्त ८ हजारांत २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम मिळणार; आयटेलच्या फोनचा बाजारात धुमाकूळ!

Jan 03, 2024 01:31 PM IST

Itel A70: आयटेल कंपनीने नुकताच त्यांचा ए ७० स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे.

itel A70
itel A70

Smartphones Under 8000: चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी आयटेलने काही दिवसांपर्वी भारतीय बाजारात अनेक फोन लॉन्च केले. यातील आयटेलच्या ए ७० या फोनने बाजारात धुमाकूळ घातला आहे. यामागचे कारणही तितकेच खास आहे. आयटेल ए ७० (१२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज) फोनला फक्त ७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकतात. स्पर्धक कंपन्यांच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या फोनच्या तुलनेत आयटेल ए ७० ची किंमत खूपच कमी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, हा फोन ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अमेझॉनवरून खरेदी केला जाऊ शकतो. रॅमची क्षमता वाढवण्यासाठी हा फोन Memory Fusion ची मदत घेतो. ६ जीबी इन्स्टॉल रॅमसह यात ६ जीबी व्हर्च्युअल रॅम मिळतो. याचबरोबर या फोनमधील स्टोरेज क्षमता २ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

आयटेल ४ जीबी रॅम आणि १२८ स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. तर, ६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला स्मार्टफोन फक्त ७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. या फोनच्या खरेदीवर बँक ऑफर्स देखील मिळत आहेत. हा फोन ब्रिलएंट गोल्ड, स्टार्लिश ब्लॅक, फील्ड ग्रीन आणि एज्युर ब्लू अशा चार रंगात उपलब्ध आहे.

आयटेल ए ७० स्पेसिफिकेशन्स

आयटेल ए ७० स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना ६.६ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले मिळत आहे, जो डायनमिक बार फीचर्ससह येतो. हे फीचर आयफोनमध्ये मिळणाऱ्या डायनमिक आयलँडशी प्रेरित आहेत. फोनमध्ये माऊंटेट फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. आयटेल ए ७० मध्ये १३ मेगापिक्सल सुपर एचडीआर कॅमेरा दिला आहे. तर, सेल्फीसाठी ग्राहकांना ८ मेगापिक्सचा कॅमेरा मिळत आहे. फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे.

WhatsApp channel
विभाग