ITC Hotels : आयटीसी कंपनीतून नुकत्याच वेगळ्या झालेल्या आयटीसी हॉटेल्स कंपनीचा शेअर आज चर्चेच्या केंद्रस्थानी असेल. कारण आज, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी स्टॉक सेन्सेक्स आणि इतर BSE निर्देशांकांमधून बाहेर काढलेला असेल. मागील महिन्यात हा शेअर स्वतंत्रपणे सूचीबद्ध झाली होता.
हा शेअर पोर्टफोलिओ पुनर्संतुलनासाठी सेन्सेक्स आणि इतर निर्देशांकांमध्ये तात्पुरता समाविष्ट करण्यात आला होता. २९ जानेवारी रोजी भारतीय स्टॉक एक्स्चेंजवर तो सूचीबद्ध झाला होता. हा शेअर मंगळवार, ०४ फेब्रुवारी, दुपारी २ वाजेपर्यंत कट ऑफ वेळेपर्यंत लोअर सर्किटवर न आल्यानं ते BSE निर्देशांकातून काढून टाकले जातील.
मंगळवारी आयटीसी हॉटेल्सच्या शेअरची किंमत बीएसईवर ४.१६ टक्क्यांनी कमी होऊन प्रत्येकी १६४.६५ रुपयांवर बंद झाली. सेन्सेक्समधून वगळल्यामुळं इंडेक्स ट्रॅकर्सद्वारे ४०० कोटींहून अधिक किमतीची निष्क्रिय विक्री झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय निफ्टी ५० मधून काढून टाकल्यानंतर ITC हॉटेल्सच्या शेअर्सची आणखी ७०० कोटींची विक्री होऊ शकते.
ITC हॉटेल्सचा शेअर बीएसईवर प्रत्येकी १८८ रुपयांवर आणि NSE वर प्रत्येकी १८० रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. ४ फेब्रुवारीपर्यंत आयटीसी हॉटेल्सचं बाजारमूल्य ३९ हजार कोटींवरून ३४,२६६ कोटींहून कमी झालं आहे.
ITC हॉटेल्स ही ITC Ltd मधून वेगळी झालेली कंपनी आहे. डिमर्जर प्रमाण १:१० असं होतं. म्हणजेच आयटीसी लिमिटेडच्या विद्यमान शेअरधारकांना प्रत्येक १० शेअरमागे आयटीसी हॉटेल्सचा १ शेअर मिळाला आहे. मूळ आयटीसी लिमिटेडनं नव्या कंपनीत ४० टक्के हिस्सा राखून ठेवला आहे, उर्वरित ६० टक्के हिस्सा भागधारकांना वितरित केला आहे.
आयटीसी हॉटेल्सची कामगिरी उत्तम राहिली आहे. त्याचा सरासरी रूम रेट (ARR) आर्थिक वर्ष २०१९ मध्ये ७,९०० रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १२००० पर्यंत वाढला आहे. ही वाढ ५१.९ टक्के (८.७ टक्के CAGR) आहे. प्रति उपलब्ध कक्ष महसूल (RevPAR) देखील याच कालावधीत ५,२०० वरून ८२०० वर गेला. ही वाढ ५७.७ टक्के आहे. (९.५ टक्के CAGR). आर्थिक वर्ष २०२४ मध्ये रूमच्या माध्यमातून एकूण महसुलात ५२ टक्के भर पडली तर, अन्नपदार्थ आणि कोल्ड्रिंक्सचा वाटा ४० टक्के आहे.
ऑक्टोबर २०२४ पर्यंत १४० हॉटेल्स असलेली आयटीसी हॉटेल्स ही सर्वात मोठ्या हॉटेल कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीनं २०३० पर्यंत २००+ हॉटेल्स आणि १८,०००+ कीजपर्यंत आपला पोर्टफोलिओ वाढवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.
संबंधित बातम्या