Nifty IT index Boom : आयटी कंपन्यांच्या शेअर्सनी स्टॉक मार्केटमधील वातावरण बदलून टाकलं आहे. इन्फोसिस, एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरमधील तेजीमुळं सेन्सेक्सनं आज ८२,००४.३५ ची पातळी गाठली. तर, एलअँडटी माइंडट्री, विप्रो आणि इन्फोसिसच्या जोरावर निफ्टीनं २५,११४.०५ चा उच्चांक गाठला आहे.
निफ्टी आयटी निर्देशांकात जबरदस्त वाढ झाली आहे. तो २.३२ टक्क्यांनी वाढून ४२६७५.१० च्या पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी आयटी निर्देशांकात समाविष्ट असलेल्या सर्व १० कंपन्यांच्या समभागांमध्ये बंपर उसळी पाहायला मिळत आहे.
यापैकी एलटीआय माइंडट्रीनं सर्वाधिक उसळी घेतली आहे. दुपारी सव्वा एक वाजता हा शेअर ७.५० टक्क्यांनी वधारून ६,१८३ रुपयांवर पोहोचला आहे. कोफोर्जचा शेअर ३.३९ टक्क्यांनी वधारून ६२८७ रुपयांवर व्यवहार करत आहे. विप्रोनंही आज चांगली भरारी घेतली आहे. या शेअरमध्ये ३.७४ टक्के वाढ झाली आहे. दुपारी सव्वा एकच्या सुमारास हा शेअर ३.८८ टक्क्यांनी वाढून ५३७.२० रुपयांवर व्यवहार करत होता.
एमफॅसिसमध्ये २.२४ टक्के वाढ झाली आहे. त्यात प्रति शेअर ६८ रुपयांची वाढ झाली असून तो ३१०२ रुपयांवर पोहोचला आहे. इन्फोसिसचा शेअर एनएसईवर २.३६ टक्क्यांनी वधारला आहे. या शेअरचा भाव १९४४.९५ रुपयांवर पोहोचला आहे. पर्सिस्टंटचा शेअर २.२४ टक्क्यांनी वधारला आहे. तो १०९.९५ रुपयांनी वाढून ५०१९.५० रुपयांवर पोहोचला आहे.
एलटीटीएसमध्ये ३.६० टक्क्यांची वाढ झाली असून हा शेअर ५६८४.९५ रुपयांवर पोहोचला आहे. एचसीएल टेक १.२६ टक्क्यांनी वधारला आहे. आता हा टेक स्टॉक १७३३.१० रुपयांवर आहे. टीसीएस ०.६२ टक्क्यांनी वधारून ४५२४.९० रुपयांवर व्यवहार करत आहे. टेक महिंद्राच्या शेअरमध्येही चांगली वाढ झाली आहे. हा शेअर २.३२ टक्क्यांनी वधारून १६६२.३० रुपयांवर पोहोचला आहे.