stocks to buy : अर्थसंकल्पानंतर कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची? तज्ज्ञांनी सुचवले हे ९ शेअर
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stocks to buy : अर्थसंकल्पानंतर कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची? तज्ज्ञांनी सुचवले हे ९ शेअर

stocks to buy : अर्थसंकल्पानंतर कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची? तज्ज्ञांनी सुचवले हे ९ शेअर

Jul 24, 2024 10:00 AM IST

Stocks to buy after budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल? पाहा काय म्हणतात मार्केट एक्सपर्ट्स

अर्थसंकल्पानंतर कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची? तज्ज्ञांनी सुचवले हे ९ शेअर
अर्थसंकल्पानंतर कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची? तज्ज्ञांनी सुचवले हे ९ शेअर

Stocks to buy after budget 2024 : निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार पडला आहे. त्यामुळं गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. मात्र, चिंतेची काहीही गरज नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अर्थसंकल्पातील विविध तरतुदींचा अभ्यास करून व दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून योग्य स्टॉक्समध्ये गुंतवणूक करता येईल.

तज्ज्ञांच्या मतानुसार, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा अर्थसंकल्प ही एक संधी आहे. भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढं आणण्यासाठी आर्थिक विकासाला गती देणं हे या अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट आहे. मॅन्युफॅक्चरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स आणि पॉवर सेक्टरमध्ये अजूनही मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी संधी आहेत, असं तज्ज्ञांना वाटतं.

'स्टॉकबॉक्स'चे रिसर्च हेड मनीष चौधरी यांनी यावर सविस्तर प्रकाश टाकला. बिहार आणि आंध्र प्रदेशवर विशेष लक्ष केंद्रित करून वित्तीय विवेक आणि कल्याणकारी योजनांमधील उत्तम समतोल हे अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे. रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास, उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा आणि नवीन क्षेत्रांसाठी सिस्टिम बळकट करणे आणि ग्रामीण उत्पन्नावर मुख्य लक्ष केंद्रित करून लोकांचं उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर आहे.

'एसएस वेल्थस्ट्रीट'च्या संस्थापक सुगंधा सचदेवा म्हणाल्या, आर्थिक वर्ष २०२५ साठी वित्तीय तूट जीडीपीच्या ४.९ टक्के आहे. ही तूट अंतरिम अर्थसंकल्पीय अंदाजात वर्तवलेल्या ५.१ टक्क्यांपेक्षा कमी आहे. हे सकारात्मक आहे.

कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी?

एसएस वेल्थस्ट्रीटच्या सुगंधा सचदेवा यांनी ‘लाइव्ह मिंट’शी बोलताना ९ शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर पुढीलप्रमाणे…

एसबीआय कार्ड : हा शेअर ६८० ते ६८५ रुपयांत खरेदी करा. ८४९ रुपयांचे टार्गेट ठेवा. ५९५ रुपयांचा स्टॉप लॉस ठेवायला विसरू नका.

ओबेरॉय रियल्टी : १५७० ते १५८० रुपयांना खरेदी करता येईल. २०५० रुपयांचं टार्गेट ठेवा. हे करताना १२८० चा स्टॉप लॉस ठेवा.

राइट्स : ६५० ते ६६० रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा शेअर ८८० पर्यंत जाऊ शकतो. स्टॉपलॉस ५२० रुपये लावावा.

केपीआयटी टेक : १६९० ते १६९५ ला खरेदी करा. २०८० पर्यंत हा शेअर झेप घेऊ शकतो. १५०० रुपयांचा स्टॉपलॉस लावावा.

एचबीएल पॉवर : हा शेअर ७६५ रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. ५४० ते ५५० रुपयांच्या दरम्यान खरेदी करता येईल. स्टॉप लॉस ४३० रुपये ठेवा.

राजेश एक्सपोर्ट : हा शेअर ४३५ रुपयांवर जाऊ शकतो. ३१० ते ३१२ रुपयांमध्ये खरेदी करावा. स्टॉप लॉस २२५ रुपये ठेवा.

रॅम्को सिमेंट : ७९० ते ७९५ रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस ९६५ रुपये असून स्टॉपलॉस ६८० रुपये ठेवा.

एनसीसी : हा शेअर २७० रुपयांचा स्टॉपलॉस लावून खरेदी करा. तो ४३५ वर जाण्याची शक्यता आहे.

टाटा कन्झ्युमर : सध्या १२२८ असलेला हा शेअर १४८० वर जाण्याचा अंदाज आहे. १०७० चा स्टॉपलॉस लावून खरेदी करता येईल.

 

(डिस्क्लेमर : तज्ज्ञांच्या शिफारशी, सूचना, मते आणि मते ही त्यांची स्वतःची आहेत, हिंदुस्थान टाइम्स मराठीची नाहीत. ही केवळ शेअरच्या कामगिरीची माहिती आहे, हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्यापूर्वी सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner