Stocks to Buy : तज्ज्ञांनी सुचवलेले हे ११ शेअर खरेदी करणं ठरेल शहाणपणाचं! कोणत्या आहेत कंपन्या?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks to Buy : तज्ज्ञांनी सुचवलेले हे ११ शेअर खरेदी करणं ठरेल शहाणपणाचं! कोणत्या आहेत कंपन्या?

Stocks to Buy : तज्ज्ञांनी सुचवलेले हे ११ शेअर खरेदी करणं ठरेल शहाणपणाचं! कोणत्या आहेत कंपन्या?

HT Marathi Desk HT Marathi
Nov 12, 2024 09:47 AM IST

Stocks to buy : शेअर बाजारात सध्या निरुत्साह दिसत असून या पार्श्वभूमीवर कोणते शेअर्स खरेदी करणं फायद्याचं ठरेल. जाणून घेऊया तज्ज्ञांकडून

3 तज्ज्ञांचा सल्ला आहे हे 11 शेअर्स आज खरेदी करणे शहाणपणाचे
3 तज्ज्ञांचा सल्ला आहे हे 11 शेअर्स आज खरेदी करणे शहाणपणाचे

Stock Market Updates : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालानंतर नव्या सरकारच्या धोरणांचा अर्थजगतावर आणि शेअर बाजारावर काय परिणाम होईल याकडं जाणकार लक्ष ठेवून आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक्सपर्ट्सनी आज खरेदी करण्यासाठी ११ शेअर्सची नावं सुचवली आहेत.

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगरिया यांनी वर्धमान होल्डिंग्स, तैनवाला केमिकल्स, मेश अ‍ॅग्रो, आयटीआय आणि आरोन इंडस्ट्रीज या पाच शेअर्सवर डाव लावण्यास सांगितलं आहे. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी झोमॅटो लिमिटेड, जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड आणि मणप्पुरम फायनान्स लिमिटेड खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तर, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी तीन शेअर सुचवले आहेत.

सुमित बागरियांचा सल्ला

वर्धमान होल्डिंग्स लिमिटेड किंवा व्हीएचएल

हा शेअर ५९०० रुपयांचं लक्ष्य ठेवून ५५२६.५५ रुपयांपर्यंत खरेदी करा. स्टॉपलॉस ५३३३ रुपयांवर ठेवण्यास विसरू नका.

ताईवाला केमिकल्स :

हा शेअर ३१५.०५ रुपयांवर खरेदी करा. ३३५ चं टार्गेट ठेवा. ३०५ रुपयांवर स्टॉप लॉस लावा.

मेष ऍग्रो : २९६.७५ रुपयांना खरेदी करा, टार्गेट ३१० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस २८५ रुपये ठेवायला विसरू नका.

आयटीआय ३२७.३५ रुपयांना घ्या. टार्गेट ३४५ रुपये आणि स्टॉपलॉस ३१६ रुपये ठेवा.

आरोन इंडस्ट्रीज : २८८.९५ रुपयांवर खरेदी करा, टार्गेट प्राइस ३०२ रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस २८० रुपये ठेवा.

वैशाली पारेख यांचे आवडते शेअर्स

झोमॅटो : २५७ रुपयांना खरेदी करा, टार्गेट २७० रुपये, स्टॉप लॉस २४८.२० रुपये ठेवा.

जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड ९०९ रुपयांत खरेदी करा, ९४० रुपयांचे टार्गेट ठेवा आणि ८९०.२० रुपयांवर ठेवा.

मणप्पुरम फायनान्स लिमिटेड : १५४ रुपयांना खरेदी करा; १६० रुपयांचं लक्ष्य ठेवा आणि स्टॉपलॉस १४९ रुपयांवर स्टॉप लॉस ठेवा.

गणेश डोंगरे यांचा सल्ला

एचडीएफसी बँक १७६४ रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस १८१० रुपये ठेवा. स्टॉपलॉस १७३० रुपयांवर ठेवा.

इंडसइंड बँक लिमिटेड : इंडसइंड बँक १६१० रुपयांचं टार्गेट ठेवून १०३० रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी करा.

गेल (इंडिया) लिमिटेड : गेलवर २०३ रुपयांपर्यंत खरेदी करा. स्टॉप लॉस १९५ रुपये  आणि टार्गेट २२० रुपये ठेवा. 

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner