Stocks To Buy : सुझलॉन आणि ओलासह या १० शेअर्सची खरेदी आज ठरेल फायद्याची, पाहा तज्ज्ञ काय म्हणतात!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks To Buy : सुझलॉन आणि ओलासह या १० शेअर्सची खरेदी आज ठरेल फायद्याची, पाहा तज्ज्ञ काय म्हणतात!

Stocks To Buy : सुझलॉन आणि ओलासह या १० शेअर्सची खरेदी आज ठरेल फायद्याची, पाहा तज्ज्ञ काय म्हणतात!

Dec 03, 2024 09:51 AM IST

Stocks to buy today : मधल्या काळातील पडझडीनंतर पुन्हा सावरून लागलेल्या बाजारात आज इंट्रा डे ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी काही स्टॉक्स सुचवले आहेत.

सुझलॉन, ओलासह हे 10 शेअर्स आज खरेदी करणे योग्य
सुझलॉन, ओलासह हे 10 शेअर्स आज खरेदी करणे योग्य (PTI File Photo)

Stock Market update : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार पुन्हा सावरताना दिसत आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांचे चेहरेही फुलू लागले आहेत. अशा परिस्थितीत इंट्रा डेसाठी कोणते शेअर घेणं फायद्याचं ठरेल याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.

एसएस वेल्थस्ट्रीटच्या शेअर बाजार तज्ज्ञ सुगंधा सचदेवा आणि हेन्सेक्स सिक्युरिटीजच्या एव्हीपी रिसर्चचे महेश एम ओझा यांनी सुझलॉन एनर्जी, ओला इलेक्ट्रिक, स्नोमॅन लॉजिस्टिक्स, लॉईड्स इंजिनीअरिंग वर्क्स आणि धानी सर्व्हिसेस या ५ शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागरिया यांनी नेल्को, मालू पेपर मिल्स, पोकर्ण, डीएमसीसी आणि सियाराम सिल्क मिल्स हे ५ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

सुगंधा सचदेवा आणि महेश एम ओझा यांची शिफारस

सुझलॉन एनर्जी : ६८.८० रुपयांचं लक्ष्य ठेवून ६४ रुपयांत खरेदी करा. ६२ रुपयांवर स्टॉप लॉस ठेवा.

ओला इलेक्ट्रिक: ८९ रुपयांत खरेदी करून ९९ रुपयांचं लक्ष्य ठेवा आणि ९४ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.

स्नोमॅन लॉजिस्टिक्स : ७५.८० रुपयांवर खरेदी करा. ७९.५० रुपये, ८२ रुपये, ८५ रुपये आणि ८८ रुपयांचं लक्ष्य ठेवा. स्टॉप लॉस ७१.८० रुपये ठेवा.

लॉयड्स इंजिनीअरिंग वर्क्स : ७७.४५ रुपयांत खरेदी करा. टार्गेट ८० रुपये, ८३ रुपये, ८५ रुपये आणि ८८ रुपये असं ठेवा. स्टॉपलॉस ७२.८० रुपयांवर ठेवा.

धानी सर्व्हिसेस : ७८ ते ७९ रुपयांना खरेदी करून टार्गेट ८२ रुपये, ८५ रुपये, ८८ रुपये, ९४ रुपये आणि १०० रुपयांपर्यंत ठेवा. स्टॉपलॉस ७३ रुपये ठेवा.

सुमीत बागरिया यांचा सल्ला

नेल्को : १२३४.९० रुपयांना खरेदी करून टार्गेट १३०५ रुपयांचं ठेवा. स्टॉप लॉस ११९२ रुपये ठेवा.

मालू पेपर मिल : हा शेअर ५२.९६ रुपयांना खरेदी करा. टार्गेट ५७ रुपये ठेवून स्टॉप लॉस ५१ रुपये ठेवा.

पोकर्ण : हा शेअर १२२५.१० रुपयांना खरेदी करा. लक्ष्य १३३३ रुपयांचं ठेवा आणि ११८० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.

डीएमसीसी: ३२८.५० रुपयांना खरेदी करा, ३५० रुपयांचं टार्गेट प्राइस सेट करा आणि ३१६ रुपये स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.

सियाराम सिल्क मिल : ८६६.८५ रुपयांना खरेदी करा, ९३० रुपयांचं लक्ष्य ठेवा आणि ८३५ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner