Stocks To Buy : हे १० स्टॉक्स खरेदी करणं आज ठरेल शहाणपणाचं! पाच आहेत ब्रेकआउट स्टॉक्स
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks To Buy : हे १० स्टॉक्स खरेदी करणं आज ठरेल शहाणपणाचं! पाच आहेत ब्रेकआउट स्टॉक्स

Stocks To Buy : हे १० स्टॉक्स खरेदी करणं आज ठरेल शहाणपणाचं! पाच आहेत ब्रेकआउट स्टॉक्स

Jan 17, 2025 09:25 AM IST

Stocks To Buy Today : गेल्या दोन दिवसांपासून वधारणाऱ्या शेअर बाजारात खरेदी करण्यासाठी तज्ज्ञांनी आज तब्बल १० स्टॉक्स सुचवले आहेत.

Stocks To Buy : हे १० स्टॉक्स खरेदी करणं आज ठरेल शहाणपणाचं! पाच आहेत ब्रेकआउट स्टॉक्स
Stocks To Buy : हे १० स्टॉक्स खरेदी करणं आज ठरेल शहाणपणाचं! पाच आहेत ब्रेकआउट स्टॉक्स

Stock Market News : चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बगरिया यांनी रामकृष्ण फोर्जिंग्स, व्ही टू रिटेल, नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर, स्टोव्ह क्राफ्ट आणि ईमुद्रा या कंपन्यांमध्ये आज खरेदी करावयाच्या ब्रेकआऊट शेअर्ससंदर्भात खरेदीची शिफारस केली आहे. याशिवाय बगरिया यांनी आजसाठी आणखी दोन स्टॉक निवडीची शिफारस केली आहे. आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी तीन शेअर्स सुचवले आहेत. यामध्ये टीसीपीएल पॅकेजिंग लिमिटेड, गणेश हाऊसिंग कॉर्पोरेशन, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड आणि ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे.

सुमित बागरिया यांचे ब्रेकआऊट शेअर्स

रामकृष्ण फोर्जिंग्स

हा शेअर ९९०.४० रुपयांना खरेदी करा, १०५० रुपयांचे टार्गेट ठेवा आणि ९५० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.

व्ही २ रिटेल

हा शेअर १८७१.७५ रुपयांना खरेदी करा, २०२० चं लक्ष्य ठेवा आणि १८०० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवा.

नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर

नॅकडॅक इन्फ्रा हा शेअर ८३ रुपयांना खरेदी करा, ९० रुपयांचे उद्दिष्ट आणि ८० रुपयांचा स्टॉप लॉस लावा.

स्टोव्ह क्राफ्ट

हा शेअर ९४२.८० रुपयांना खरेदी करा, १०१० रुपयांचे टार्गेट ठेवा आणि ९०५ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.

ईमुद्रा

हा शेअर ९६५.२० रुपयांत खरेदी करा, टार्गेट १०३० रुपये आणि स्टॉपलॉस ९२५ रुपये ठेवा.

सुमित बागरिया यांचे इतर स्टॉक्स

टीसीपीएल पॅकेजिंग लिमिटेड

टीसीपीएल पॅकेजिंग ३५३१.४५ रुपयांना खरेदी करा. 

गणेश हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड

गणेश हाऊसिंगचा शेअर १३१३ रुपयांना खरेदी करा. १२६५ रुपये स्टॉप लॉस आणि १४०० रुपये टार्गेट प्राइस ठेवा.

गणेश डोंगरे यांची शिफारस

गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड

गोदरेज प्रॉपर्टीज २३६५ रुपयांना खरेदी करा. टार्गेट २४६० रुपये आणि स्टॉपलॉस २३१० रुपये ठेवा.

आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड

आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलचा शेअर २७६ रुपयांना खरेदी करा. स्टॉपलॉस २७० रुपयांचा आणि टार्गेट २८९ रुपये ठेवा.

ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड

ग्रासिमवर 'बाय' रेटिंग असून हा शेअर २,३५९ रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस २,४२० रुपये आणि स्टॉपलॉस २३२० रुपये ठेवा.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner