Stocks To Buy : पाच ब्रेकआउट स्टॉक्ससह ‘हे’ १० शेअर घेणं आज ठरेल शहाणपणाचं, जाणून घ्या सविस्तर
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks To Buy : पाच ब्रेकआउट स्टॉक्ससह ‘हे’ १० शेअर घेणं आज ठरेल शहाणपणाचं, जाणून घ्या सविस्तर

Stocks To Buy : पाच ब्रेकआउट स्टॉक्ससह ‘हे’ १० शेअर घेणं आज ठरेल शहाणपणाचं, जाणून घ्या सविस्तर

Dec 26, 2024 10:27 AM IST

Stocks To Buy News in Marathi : चॉइस ब्रोकिंगचे सुमित बागरिया आणि 'आनंद राठी'चे गणेश डोंगरे यांनी आज खरेदी करण्यासाठी एकूण १० शेअर्सची शिफारस केली आहे.

Stocks To Buy : ब्रेकआउट स्टॉक्ससह ‘हे’ १० शेअर घेणं आज ठरेल शहाणपणाचं, जाणून घ्या सविस्तर
Stocks To Buy : ब्रेकआउट स्टॉक्ससह ‘हे’ १० शेअर घेणं आज ठरेल शहाणपणाचं, जाणून घ्या सविस्तर

Share Market News : वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. वर्षाचा शेवट आर्थिकदृष्ट्या गोड व्हावा असाच प्रत्येकाचा प्रयत्न आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारही यास अपवाद नाहीत. अशा गुंतवणूकदारांना खरेदी करता यावेत यासाठी मार्केट एक्सपर्ट्सनी आज काही शेअर सुचवले आहेत.

चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बगडिया यांनी आजसाठी ५ ब्रेकआऊट शेअर्ससह एकूण ७ शेअर्स निवडण्याची शिफारस केली आहे. आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी तीन स्टॉक आयडिया सुचविल्या आहेत. यात वोक्हार्ट, अ‍ॅमी ऑर्गेनिक्स, एमईटीएसएल, कारट्रेड टेक, वेलस्पन एंटरप्रायजेस, युनायटेड ब्रुअरीज लिमिटेड, केएफआयएन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, टाटा केमिकल्स लिमिटेड, एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड आणि कोटक महिंद्रा बँक लिमिटेड यांचा समावेश आहे.

सुमित बागरिया यांची शिफारस 

वोक्हार्ट : हा शेअर १४८६.५० रुपयांना खरेदी करा. टार्गेट १६०० रुपये ठेवा आणि स्टॉप लॉस १४३० रुपये टाकायला विसरू नका.

अ‍ॅमी ऑर्गेनिक्स : हा शेअर २३०० रुपयांत खरेदी करा. टार्गेट २४८० रुपये ठेवा आणि २२२२ रुपये स्टॉप लॉस ठेवा.

एमईटीएसएल : हा शेअर १९१ रुपयांत खरेदी करा. टार्गेट २०५ रुपये ठेवा आणि १८४ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.

कारट्रेड टेक : हा शेअर १६१५.२० रुपयांना खरेदी करा. १७२५ रुपयांचं लक्ष्य आणि १५५० रुपये स्टॉप लॉस ठेवा.

वेलस्पन एन्टरप्रायझेस : हा शेअर ५८९.८५ रुपयांवर खरेदी करा. ६३० रुपये लक्ष्य आणि ५६५ रुपये स्टॉप लॉस ठेवा.

सुमित बागरिया यांचे इतर शेअर्स

युनायटेड ब्रुअरीज लिमिटेड : युनायटेड ब्रुअरीजचा शेअर २१९६ रुपयांच्या टार्गेटसह १९८० रुपयांना खरेदी करा. स्टॉपलॉस २०५२.७५ रुपये ठेवा.

केएफआयएन टेक्नॉलॉजीज लिमिटेड : केएफआयएन टेक्नॉलॉजीज १४७६.९५ रुपयांना खरेदी करा. १५६५ रुपयांच्या टार्गेट प्राइससह स्टॉपलॉस १४२० रुपये ठेवा.

गणेश डोंगरे यांचा सल्ला

टाटा केमिकल्स लिमिटेड : टाटा केमिकल्स १०७० रुपयांना खरेदी करता येईल. स्टॉपलॉस १०३० रुपये आणि टार्गेट प्राइस ११३५ रुपये आहे.

एसबीआय कार्ड्स : एसबीआय कार्ड्सवर 'बाय' रेटिंग असून ७४० रुपयांच्या टार्गेट प्राइसवर ६८० रुपयांचा स्टॉपलॉस आहे.

कोटक महिंद्रा बँक : कोटक बँकेचा शेअर १७५० रुपयांना खरेदी करा. १७९० रुपयांच्या टार्गेटसाठी स्टॉपलॉस १७३० रुपये ठेवा.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner