Deadline 31 March : ३१ मार्च आधी न चुकता करा ही पाच कामं, नाहीतर अडचणीत याल!
march year end deadline : १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु होत आहे. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी सरकारद्वारे लावण्यात आलेल्या नव्या नियमांतर्गत स्वत चे आर्थिक ताळेबंदी अपडेट करणे गरजेचे आहे. ३१ मार्चपूर्वी या पाच गोष्टी तुम्हाला टू डू लिस्टमध्ये अपडेट करायच्या आहेत. -
Deadline 31 March : : १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु होत आहे. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी सरकारद्वारे लावण्यात आलेल्या नव्या नियमांतर्गत स्वत चे आर्थिक ताळेबंदी अपडेट करण्यासाठी आता केवळ १० दिवसच उरले आहेत. त्यातही राम नवमीची सुट्टी असल्याने केवळ ९ दिवस राहिले आहेत. त्यामुळेच मार्च महिना संपण्यापूर्वी या पाच महत्त्वाच्या गोष्टी करणे गरजेचे आहे.
ट्रेंडिंग न्यूज
१. अपडेटेड आयकर परतावा
आर्थिक वर्ष २०१९.२० अथवा मूल्यांकन वर्ष २०२०-२१ साठी अपडेट इनकम टॅक्स रिटर्न्स जमा कऱण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ आहे. अपडेटेड आयटीआर जमा करणे हे सर्वात महत्त्वाच्या कामांपैकी एक आहे.
पॅन आधार लिंक
इनकम टॅक्स विभागाने आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च केली आहे. इनकम टॅक्स विभागानुसार, जर ३१ मार्चपर्यंत पॅन आधार लिंक केले नाही तर पॅन कार्ड एक एप्रिलपासून निष्क्रिय होईल. पॅन आधार लिंक करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पण एप्रिलपासून १ हजार रुपये शुल्क भरावे लागेल.
टॅक्स देणाऱ्या कंपोजिशन स्कीमची निवड करा
सरकारला कर देणाऱ्या ज्या लोकांचा टर्नओव्हर १.५ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे ते कंपोजिशन स्कीमची निवड करु शकतात. कंपोजिशन योजनेचा पर्याय निवडण्याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे. टर्नओव्हरची ताळेबंदी करण्यासाठी पॅनसहित नोंदणीकृत सर्व व्यवसायांच्या टर्नओव्हर लक्षात घेणे गरजेचे आहे.
बचत खाते निष्क्रिय होण्यापासून सावधान
पीपीएफ, एनपीएस, सुकन्या समृद्धी योजनांसारख्या योजना सक्रिय ठेवण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात एक किमान रक्कम जमा ठेवणे गरजेचे असते. पीपीएफ, एसएसवाय, एनपीएसमध्ये किमान रक्कम जमा ठेवण्यास असफल असलेली खाती बंद केली जातील. ही खाती पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी वेळ लागेल पण त्याचबरोबर भूर्दंडही भरावा लागेल. ही प्रक्रिया ३१ मार्चपूर्वी करणे गरजेचे ठरणार आहे.
इनकम टॅक्समध्ये कपातीचा दावा
मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. जर तुम्ही नोकरदार असाल आणि तुमच्या कमाईची मर्यादा आयकराच्या कक्षेत येत असेल तर त्यांना पीपीएफ, ईएलएसएस, म्युच्युअल फंड आणि टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक करावी लागेल. असे केल्याने तुम्ही इनकम टॅक्समध्ये कपातीसाठी दावा करु शकतात.
संबंधित बातम्या
विभाग