मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Isha Ambani Net worth : अंबानी कुटूंबाच्या लाडक्या लेकीचे घर राजमहलासारखे, पहा ईशा अंबानीचे नेटवर्थ

Isha Ambani Net worth : अंबानी कुटूंबाच्या लाडक्या लेकीचे घर राजमहलासारखे, पहा ईशा अंबानीचे नेटवर्थ

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 02, 2023 06:12 PM IST

Isha Ambani Networth : मुकेश आणि नीता अंबानींची लाडकी लेक ईशा अंबानीचे लग्न आनंद पिरामल याच्याशी २०१८ मध्ये झाले. रिलायन्सच्या रिटेल सेगमेंटची धुरा आज तिच्याकडे आहे.

AMbani Kids HT
AMbani Kids HT

Isha Ambani Networth : रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. एवढेच नाही तर फोर्ब्सच्या यादीतील टॉप १० श्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबासारखे उच्चभ्रू जीवन जगण्याचे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते. वडील इतके श्रीमंत असताना त्यांच्या मुलांचे आयुष्य कसे असेल?

हा विचार तुमच्याही मनात येत असेल तर जाणून घेऊ इशा अंबानीच्या जीवनशैलीबद्दल. उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचे २०१८ साली लग्न झाले. या लग्नाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. ईशा अंबानीच्या लग्नात सुमारे ७२० कोटी रुपये खर्च करण्यात आले. ईशा अंबानीचे आयुष्य स्वप्नातल्या राजकुमारीप्रमाणेच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. एका मोठ्या उद्योगपती घराण्याची सून बनलेल्या ईशा अंबानीचे लग्नापूर्वी घर कसे आहे आणि लग्नापूर्वी तिची स्वतःची किती प्रॉपर्टी होती? आणि ती किती लक्झरी लाईफ जगते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करु.

Isha Ambani HT
Isha Ambani HT

ईशा अंबानीचा बंगला

ईशा अंबानी लग्नाआधी वडील मुकेश अंबानी यांच्या घरी मुंबईतील अँटिलिया येथे कुटुंबासोबत राहत होती. पण लग्नानंतर ती पती आनंद पिरामलसोबत राहते. मुंबईत वरळीत तिचा आलीशान बंगला आहे. तो तिच्या सासऱ्यांनी उभयतांना भेट दिला आहे. या बंगल्याचे नाव गुलिटा असे आहे. हा बंगला २०१२ मध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरकडून खरेदी करण्यात आला होता. त्यावेळी या आलिशान बंगल्याची किंमत सुमारे १० अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ४५० कोटी रुपये होती,

आता या आलीशान बंगल्याची किंमत बांधकामानंतर अधिक वाढली आहे. हा पाच मजली बंगला ५० हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. घरात तीन तळघर, पार्किंग, एका मजल्यावर बाग आहे. घरात अनेक बेडरूम, स्टडी रूम, स्विमिंग पूल, ड्रेसिंग रूम आणि सर्व आलिशान सुविधा आहेत. वरळीच्या समुद्राच्या भागाजवळ असलेला हा बंगला सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो.

ईशा अंबानीचे नेटवर्थ

ईशा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अनेक कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहे. एका अहवालानुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे १०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ६६८ कोटी रुपये आहे.

उत्पन्नाचे साधन

ईशा अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजची शेअरहोल्डर आहे. याशिवाय, २०१६ मध्ये, लॅक्मे फॅशन वीकमध्ये अजिओ फॅशन हा ऑनलाइन ब्रँड तिने लाँच केला होता. ईशा अंबानी त्यांची मालकीण आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये, ईशा अंबानीने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या फॅशन ब्रँडमध्ये रिलायन्स ब्रँडद्वारे ४०% स्टेक खरेदी केला.

ईशा अंबानीची आवड

शालेय जीवनापासून ईशा अंबानीला फुटबॉलची आवड आहे. ईशा पियानोदेखील वाजवते. याशिवाय ईशाला आई नीता अंबानीप्रमाणेच फॅशन ब्रँडमध्ये खूप रस आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग