मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचा '२०२४ हुरुन इंडिया अंडर ३५'च्या पहिल्या यादीत सर्वात तरुण महिला उद्योजक म्हणून समावेश करण्यात आला आहे. ईशाव्यतिरिक्त परिता पारेख देखील सर्वात तरुण उद्योजक म्हणून या यादीत सामील झाली आहे. ही यादी भारतभरातील ३५ किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या १५० उद्योजकांची आहे. यात अशा उद्योजकांचा समावेश आहे ज्यांच्या व्यवसायाचे मूल्य 50 दशलक्ष डॉलर आहे. तर नेक्स्ट जनरेशन बिझनेस एंटरप्रेन्योरचे मूल्य 100 दशलक्ष डॉलर ्स आहे.
31 वर्षीय अंकुश सचदेवा 2024 हुरुन इंडिया अंडर 35 लिस्टमध्ये सर्वात तरुण पुरुष उद्योजक म्हणून सामील झाला आहे. मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश अंबानी या यादीत 32 व्या स्थानावर आहेत. हुरुन इंडियाच्या अहवालानुसार या यादीतील ८२ टक्के उद्योजक पहिल्या पिढीतील उद्योजक असून त्यांची संख्या १२३ इतकी आहे.
2024 हुरुन इंडिया अंडर 35 च्या यादीमध्ये एकूण सात महिला उद्योजकांचा समावेश होता. ईशा आणि परिता पारेख यांच्याव्यतिरिक्त अनेरी पटेल, अनिशा तिवारी आणि अंजली मर्चंट हे ३३ किंवा ३४ वर्षांचे आहेत. त्याचप्रमाणे 34 वर्षीय सलोनी आनंदला तिच्या ट्रेया हेल्थ या कंपनीच्या यशामुळे स्थान मिळाले आहे. ३५ वर्षीय गझल अलघ यांना 'मामार्थ'च्या यशस्वी नेतृत्वासाठी ओळखले जाते. हा स्टार्टअप नुकताच शेअर बाजारात लिस्टही झाला होता.