मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stock Market : शनिवार असूनही उद्या शेअर बाजारात ट्रेडिंग होणार, काय आहे कारण?

Stock Market : शनिवार असूनही उद्या शेअर बाजारात ट्रेडिंग होणार, काय आहे कारण?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 19, 2024 06:27 PM IST

Stock Market special session on Saturday 20 January : काही कारणास्तव शनिवार, २० जानेवारी २०२४ रोजी सुट्टीचा दिवस असूनही शेअर बाजारात विशेष ट्रेडिंग होणार आहे.

Stock Exchange
Stock Exchange (Photo: Mint)

Stock Market Special Live Trading Session : शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. उद्या शनिवार असूनही शेअर बाजार सुरू राहणार असून बाजारात स्पेशल ट्रेडिंग होणार आहे. सर्वसाधारणपणे शनिवार आणि रविवारच्या दिवशी राष्ट्रीय शेअर बाजार व मुंबई शेअर बाजार हे दोन्ही बाजार बंद असतात. मात्र, उद्या तसं होणार नाही. 

अलीकडंच स्टॉक एक्सचेंजकडून एक परिपत्रक काढण्यात आलं आहे. त्या परिपत्रकानुसार, डिझास्टर रिकव्हरी (DR) साइटवर स्विच करण्यासाठी २ विशेष लाइव्ह सत्रं आयोजित केली जाणार आहेत. त्यातील पहिलं सत्र उद्या सकाळी ९.१५ वाजता सुरू होईल. ते सकाळी १०.०० वाजता संपेल. तर, दुसरं सत्र सकाळी ११.३० वाजता सुरू होऊन दुपारी १२.३० वाजता संपेल.

Dividend Stocks : एका शेअरवर २७ रुपये डिविडंड; टाटाची 'ही' कंपनी भरणार गुंतवणूकदारांचा खिसा

नेमकं काय तपासलं जाणार?

आपत्कालीन परिस्थितीत सर्व्हरची क्षमता काय आहे हे या ट्रेडिंग सत्राद्वारे पाहिलं जाणार आहे. या अंतर्गत, स्टॉक एक्सचेंज डिझास्टर रिकव्हरी (DR) साइटची चाचणी घेईल. प्रतिकूल परिस्थितीत कोणताही अडथळा न येता ट्रेडिंग चालू ठेवता यावं, हा यामागचा हेतू आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास, एखादा सायबर हल्ला जाला, सर्व्हर क्रॅश झाला किंवा आणखी कुठला अडथळा आल्यास त्या परिस्थितीत ट्रेडिंग डिझास्टर रिकव्हरी (DR) साइटवर हलवले जातील. यामुळं बाजारात स्थिरता कायम राहील आणि गुंतवणूकदार आणि व्यवहारही सुरळीत सुरू राहतील.

या वेळेत करता येतील व्यवहार

एनएसईच्या परिपत्रकानुसार, इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये उद्या, २० जानेवारी रोजी मूळ साइटवरून डिझास्टर रिकव्हरी साइटवर इंट्रा-डे स्विचसह एक विशेष लाइव्ह ट्रेडिंग सत्र आयोजित केलं जाईल. त्याची वेळ पुढीलप्रमाणे असेल-

सकाळी ९.०० ते ९.०८ या वेळेत प्री-ओपन सेशन असेल.

यानंतर नियमित बाजार सकाळी ९.१५ वाजता उघडेल आणि १०.०० वाजता बंद होईल.

या कालावधीत मूळ वेबसाइटवर ट्रेडिंग होईल.

व्होडाफोनच्या 'या' प्लानसमोर जिओ- एअरटेल फेल; अवघ्या १५१ रुपयांत हॉट स्टॉर सब्सक्रिप्शनसह बरंच काही!

दुसरे सत्र डीआर साइटवर

प्री-ओपन सत्र सकाळी ११.१५ वाजता सुरू होईल आणि ११.३० वाजता संपेल.

नियमित बाजार सकाळी ११.३० वाजता खुला होईल आणि दुपारी १२.३० वाजता बंद होईल.

दुपारी १२.४० ते १२.५० पर्यंत समारोपाचं सत्र असेल.

मुंबई शेअर बाजारातील (BSE) ट्रेडिंगच्या वेळाही याच असतील.

मार्केट एक्सपर्ट म्हणतात…

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट आनंद जेम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'शनिवारच्या व्यवहारांचं स्वरूप विविध कारणांमुळं वेगळं असेल, हे गुंतवणूकदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. सत्र खूपच कमी वेळेचं असल्यानं ट्रेडर्सना पुरेसा वेळ मिळणार नाही. अस्थिरता मर्यादित असू शकते, कारण दिवसभरातील सर्व स्टॉक्स आणि डेरिव्हेटिव्ह्ससाठी दैनंदिन ऑपरेटिंग रेंज ५ टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल.

'या खास लाइव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये गुंतवणूकदार आपली खरेदी-विक्री ऑर्डर कॅश आणि एफ अँड ओ सेगमेंटमध्ये देऊ शकतील. परंतु, हे सत्र छोटं असल्यानं गुंतवणूकदाराला वेगानं ऑर्डर द्यावी लागणार आहे. याव्यतिरिक्त, सामान्य ट्रेडिंग सत्राप्रमाणे ट्रेंड पाहण्यासाठी फारसा वेळ मिळणार नाही, असं प्रभूदास लिलाधरचे टेक्निकल अ‍ॅनालिस्ट शिजू कुथुपलक्कल यांनी सांगितलं.

WhatsApp channel

विभाग