मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरक्षित असते का? जाणून घ्या!

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरक्षित असते का? जाणून घ्या!

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 06, 2022 05:18 PM IST

Mutual Fund Investment : म्युच्युअल फंड म्हणजे लोकांनी गुंतवलेले पैसे एकत्रितरीत्या शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात. त्यावर मिळणारा लाभांश सर्वांना समान वाटून दिला जातो.

Mutual funds HT
Mutual funds HT

Mutual Fund Investment : आजकाल गुंतवणूक करण्यासाठी चांगला परतावा देणारा आणि जोखीम नसलेला पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायद्याचं असतं का याबाबत अनेक शंका घेतल्या जातात. आपल्या कष्टार्जित पैशांची बचत करुन योग्य गुंतवणूक करण्याचा सुरक्षित पर्याय म्हणून म्युच्युअल फंडाकडे पाहण्याचा कल वाढत आहे. कारण इथे बँकेतील व्याजापेक्षा जास्त परतावा यात मिळतो.

म्युच्युअल फंड संकल्पना

दरमहा अगदी किमान ठराविक रक्कम भरूनही यात गुंतवणूक करता येते. आपल्यापैकी अनेकजण म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूकही करत असतील, मात्र आजही असे अनेक लोक आहेत, ज्यांना म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय याची माहिती नसते. म्युच्युअल फंडाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा म्हणजे फंड मॅनेजर. हा फंड मॅनेजर विविध म्युच्युअल फंडातील योजना तो गुंतवणूकदारांसमोर सादर करतो. त्यातील विविध शेअर्समध्ये तो गुंतवणूकदारांचे पैसे गुंतवतो. एकाच वेळी अनेकांकडून हे फंड गोळा केले जातात. आणि योग्य वेळी लाभांशाच्या टक्केवारीप्रमाणे ते गुंतवणूकदारांना परताव्याच्या रुपात दिले जातात.

म्युच्युअल फंडाचे प्रकार

म्युच्युअल फंड प्रामुख्याने तीन प्रकारचे असतात-इक्विटी म्युच्युअल फंड,डेट म्युच्युअल फंड, आणि संतुलित म्युच्युअल फंड. यापैकी एक म्युच्युअल फंड गुंतवणूक निवडणे गुंतवणूकदारांसाठी त्रासदायक ठरू शकते. गुंतवणुकीसाठी सर्वोत्कृष्ट म्युच्युअल फंड निवडण्यासाठी, म्युच्युअल फंडाची कामगिरी, म्युच्युअल फंड पाहण्याची सूचना केली जाते.नाही आणि म्युच्युअल फंडाची तुलना देखील करा. तथापि, म्युच्युअल फंडाची अस्थिरता आणि अनिश्चितता अनेकांना दूर ठेवते.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक किती सुरक्षित ?

म्युच्युअल फंडावर सेबीचे संपूर्ण नियंत्रण असते. म्युच्युअल फंडातील ओपन-एन्डेड योजनेमधून कधीही पैसे काढता येतात. अगदी एसआयपी सुरू ठेवूनदेखील जमा शिल्लकीतील काही रक्कम काढण्याची सोय असते. क्लोज एन्डेडमध्ये मात्र हा पर्याय उपलब्ध नसतो. गुंतवणूकदाराला काही आर्थिक अडचण आल्यास काही महिन्यांकरिता एसआयपी स्थगित करता येते.

एक साधा फॉर्म भरून 3 ते 6 महिने एसआयपी थांबवता येते. म्युच्युअल फंड योजनांना भांडवली लाभावरील कर (Tax Benefit)आणि लॉक-इनचे (Lock-In) नियमही लागू होतात. एकरकमी गुंतवणूकीला तसंच एसआयपीलादेखील तीन वर्षांची मुदत अनिवार्य असते. त्या आधी त्यातील गुंतवणूक काढून घेता येत नाही. कर बचतीचा लाभदेखील म्युच्युअल फंड योजनांवर घेता येतो. त्यासाठी खास योजना सादर केल्या जातात. त्यामुळे उत्तम परतावा, जोखीम शून्य आणि कर बचतीचा फायदा देणाऱ्या अशा म्युच्युअल फंडाचा पर्याय गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानला जातो.

 

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग