नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इरेडाच्या शेअरमध्ये तुफान तेजी, तुमच्याकडं आहे का?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इरेडाच्या शेअरमध्ये तुफान तेजी, तुमच्याकडं आहे का?

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इरेडाच्या शेअरमध्ये तुफान तेजी, तुमच्याकडं आहे का?

Jan 01, 2025 02:19 PM IST

Ireda Share Price News In Marathi : इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (इरेडा)च्या शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली आहे. कंपनीनं मंजूर केलेल्या कर्जामध्ये मोठी वाढ झाल्याचा हा परिणाम आहे.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इरेडाच्या शेअरमध्ये तुफान तेजी, तुमच्याकडं आहे का?
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इरेडाच्या शेअरमध्ये तुफान तेजी, तुमच्याकडं आहे का?

Share Market News Today : नवरत्न कंपनी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (इरेडा) च्या शेअरमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तुफान तेजी आली आहे. हा शेअर बुधवारी बीएसईवर ५ टक्क्यांपेक्षा अधिक वधारून २२७.७० रुपयांवर पोहोचला. डिसेंबर २०२४ तिमाहीच्या बिझनेस अपडेटनंतर इरेडाच्या शेअर्समध्ये ही मोठी वाढ झाली आहे.

गेल्या १३ महिन्यांत इरेडाचा शेअर ३२ रुपयांवरून २२० रुपयांवर गेला आहे. 'इरेडा'च्या शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ३१० रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १००.४० रुपये आहे.

मंजूर कर्जात १२९ टक्के वाढ

डिसेंबर २०२४ तिमाहीविषयी 'इरेडा'नं दिलेल्या बिझनेस अपडेटनुसार, कंपनीनं मंजूर केलेली कर्जे वार्षिक आधारावर १२९ टक्क्यांनी वाढून ३१,०८७ कोटी रुपये झाली आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीनं १३ हजार ५५८ कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं होतं. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कर्जाचं वितरण ४१ टक्क्यांनी वाढून १७,२३६ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत थकित कर्जाची रक्कम ६९,००० कोटी रुपये होती.

कशी आहे शेअरची वाटचाल?

१३ महिन्यांत कंपनीचा इरेडाचा शेअर ३२ रुपयांवरून २२० रुपयांवर गेला आहे. इरेडाचा आयपीओ २१ नोव्हेंबर २०२३ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आणि २३ नोव्हेंबरपर्यंत खुला राहिला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ३२ रुपये होती, तोच शेअर आज, १ जानेवारी २०२५ रोजी २२७.७० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात इरेडाच्या शेअरमध्ये ११५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १ जानेवारी २०२४ रोजी कंपनीचा शेअर १०४.६५ रुपयांवर होता, तो आज इरेडाचा शेअर २२७.७० रुपयांवर पोहोचला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner