मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IREDA IPO : गुंतवणुकीची मोठी संधी! बंपर नफ्याची अपेक्षा असलेला सरकारी कंपनीचा आयपीओ आजपासून खुला

IREDA IPO : गुंतवणुकीची मोठी संधी! बंपर नफ्याची अपेक्षा असलेला सरकारी कंपनीचा आयपीओ आजपासून खुला

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Nov 21, 2023 12:58 PM IST

IREDA IPO subscription news : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आयआरईडीएचा आयपीओ आजपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होत आहे. या आयपीओसाठी अर्ज करावा की नाही? चला जाणून घेऊया

IREDA IPO
IREDA IPO

IREDA IPO subscription news : मागच्या काही वर्षांपासून आयपीओ हा शेअर बाजारातून पैसे कमावण्याचा लोकप्रिय पर्याय ठरू लागला आहे. अनेक गुंतवणूकदार कंपनीचा अंदाज घेऊन यात गुंतवणूक करतात आणि भरघोस नफा कमावतात. अशा गुंतवणूकदारांसाठी आणखी एक मोठी संधी चालून आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (IREDA) चा आयपीओ आज सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. येत्या गुरुवारपर्यंत म्हणजेच, २३ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदार या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात. IREDA च्या आयपीओसाठी ३० ते ३२ रुपयांचा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. ग्रे मार्केटमध्ये IREDA च्या आयपीओची जोरदार चर्चा असून आयपीओ नोंदणीला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. ग्रे मार्केटमध्ये हा आयपीओ सध्या ७ रुपये प्रीमियमवर आहे.

डिसेंबरमध्ये यामाहा धमाका करणार, २ स्पोर्ट्स बाईक बाजारात उतरवणार; इंजिन ते डिझाइनपर्यंत घ्या जाणून

किती शेअरचा लॉट?

IREDA च्या आयपीओमध्ये अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांना एका लॉटमध्ये ४६० शेअर मिळणार आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना हा आयपीओ घेण्यासाठी किमान १४,७२० रुपये (३२ x ४६०) मोजावे लागतील. 

आयआरईडीए या कंपनीला आयपीओच्या माध्यमातून २,१५०.२१ कोटी रुपये उभारायचे आहेत. २४ नोव्हेंबर किंवा २७ नोव्हेंबरला आयपीओ अलॉटमेंट होण्याची शक्यता आहे. एनसएई आणि बीएसई दोन्हीवर या आयपीओची नोंद होणार आहे. शेअर बाजारात हा आयपीओ २८ नोव्हेंबरला सूचीबद्ध होईल.

Gautam Singhania: रेमंडच्या मालकाला घटस्फोट महागात पडणार? पत्नीनं मागितला संपत्तीतला ७५ टक्के वाटा

अप्लाय करावा की नाही?

पुढील आठवड्यात येणाऱ्या पाच मुख्य आयपीओंपैकी IREDA गुंतवणूकदारांच्या रडारवर असेल असं तज्ज्ञांचं मत आहे. हा आयपीओ पहिल्याच दिवशी नफा मिळवून देईल, अशी शक्यता आहे. दीर्घकालीन नफ्याचं उद्दिष्ट ठेवूनही हा आयपीओ सबस्क्राइब केला जाऊ शकतो. 

राइट रिसर्चचे संस्थापक व फंड मॅनेजर सोनम श्रीवास्तव यांनी गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला आहे. ही कंपनी विश्वासार्ह आहे. कंपनीचे समभाग घेणे फायदेशीर ठरू शकते, असं श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.

 

(डिस्क्लेमर : हा लेख कंपनीची बाजारातील कामगिरी व तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. हा कुठल्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

WhatsApp channel

विभाग