IRCTC Share News : लाभांश जाहीर करूनही आयआरसीटीसीचा शेअर पडला! आता काय करायचं? एक्सपर्ट म्हणतात…
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IRCTC Share News : लाभांश जाहीर करूनही आयआरसीटीसीचा शेअर पडला! आता काय करायचं? एक्सपर्ट म्हणतात…

IRCTC Share News : लाभांश जाहीर करूनही आयआरसीटीसीचा शेअर पडला! आता काय करायचं? एक्सपर्ट म्हणतात…

May 29, 2024 01:00 PM IST

IRCTC Share Price : सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची रेल्वे कंपनी असलेल्या आयआरसीटीसीनं लाभांश जाहीर केल्यानंतरही शेअरचा भाव कोसळला आहे. अशा परिस्थितीत बाजार तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

लाभांश जाहीर करूनही आयआरटीसीचा शेअर पडला! आता काय करायचं? एक्सपर्ट म्हणतात…
लाभांश जाहीर करूनही आयआरटीसीचा शेअर पडला! आता काय करायचं? एक्सपर्ट म्हणतात…

IRCTC Share Price News : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) या सरकारी कंपनीनं आपल्या भागधारकांना प्रति शेअर ४ रुपये लाभांश जाहीर केला आहे. मात्र, लाभांश जाहीर केल्यानंतरही आज कंपनीचा शेअर जवळपास ४ टक्क्यांनी गडगडला. त्यामुळं संभ्रमित झालेल्या गुंतवणूकदारांना जाणकारांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीत IRCTC चा निव्वळ नफा अपेक्षेपेक्षा कमी झाल्यानं सध्या कंपनीच्या शेअरवर दबाव आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीला २८४ कोटी रुपये इतका निव्वळ नफा झाल आहे. मागील वर्षी याच कालावधीती हा नफा २७९ कोटी रुपये होता. यावेळी तो केवळ २ टक्क्यांनी वाढला आहे.

प्रभुदास लिलाधर या ब्रोकरेजनं आयआरसीटीसीला ३०६.६ कोटीचा नफा होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र तो चुकला. मागील वर्षीच्या अतिरिक्त खर्चाच्या तरतुदींचा नफ्यावर परिणाम झाला आहे. बिझनेस टूडेच्या वृत्तानुसार, प्रभुदास लीलाधरचे रिसर्च अॅनालिस्ट जिनेश जोशी यांनी ‘हा’ शेअर होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

आयआरसीटीसी शेअरच्या किंमतीचा इतिहास

IRCTC शेअरच्या किमतीच्या इतिहासाबद्दल बोलायचं झाल्यास या शेअरनं गुंतवणूकदारांना बऱ्यापैकी परतावा दिला आहे. मागच्या तीन वर्षांत हा शेअर १९ टक्के वाढला आहे. तर, गेल्या एका वर्षात त्यात ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या शेअरनं या वर्षी आतापर्यंत सुमारे १६ टक्के परतावा दिला आहे. तर, गेल्या सहा महिन्यांत त्यात ४७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ११३८.९० रुपये आहे आणि नीचांक ६१४.३५ रुपये आहे.

आज सकाळच्या सत्रात हा शेअर १०४६.१० रुपयांवर उघडला. त्यानंतर १०६१.३० रुपयांवर पोहोचला आणि १०२७.१५ रुपयांपर्यंत घसरला. मुंबई शेअर बाजारानुसार, आयआरसीटीसीचं बाजार भांडवल ८७ हजार कोटींच्या आसपास आहे.

(डिस्क्लेमर: या लेखातील तज्ञांच्या शिफारशी, सूचना आणि मतं ही त्यांची स्वतःची आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी त्यास दुजोरा देत नाही. ही माहिती केवळ शेअर्सच्या कामगिरीबद्दल आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं कोणताही निर्णय घेण्याआधी तुमच्या सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner