iQOO Neo 10 Series Specs Leak: स्मार्टफोन निर्माता कंपनी आयक्यूओओ त्यांचे आगामी स्मार्टफोन आयक्यूओओ निओ १० आणि निओ १० प्रो 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हे आगामी स्मार्टफोन या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च झालेल्या आयक्यूओओ निओ ९ प्रो 5G ची जागा घेतील. लॉन्चिंगआधीच या स्मार्टफोनमधील फीचर्स लीक झाले आहेत.
चीनमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबो पोस्टनुसार, आयक्यूओ निओ १० आणि निओ १० प्रो 5G स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेट किंवा मीडियाटेक डायमेंसिटी ९ हजार ४०० चिपसेटसह येण्याची शक्यता आहे. असे मानले जात आहे की, आयक्यूओ निओ १० मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेट असू शकतो. तर, निओ १० प्रो मीडियाटेक डायमेंसिटी ९ हजार ४०० चिपसेटसह येऊ शकतो जो या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. ट
आगामी आयक्यूओओ निओ १० सीरिज मेटल मिडल फ्रेमसह सुसज्ज असू शकते. आयक्यूओ निओ ९ प्रो 5G मध्ये प्लास्टिक बिल्ट फ्रेम आहे. असे मानले जात आहे की स्मार्टफोनमध्ये त्यांच्या पूर्ववर्तींप्रमाणेच फ्लॅट डिस्प्ले असू शकतो. लीक झालेल्या रेंडरमध्ये पुढे असे दिसून आले आहे की आगामी आयक्यूओ निओ १० सीरिज स्मार्टफोनमध्ये ६००० एमएएच बॅटरी असण्याची शक्यता आहे, जी १०० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
लीकनुसार, आयक्यूओ निओ १० सीरिज त्याच्या आधीच्या निओ ९ प्रो 5G प्रमाणेच येत्या वर्षी फेब्रुवारीच्या आसपास लाँच होण्याची शक्यता आहे. तथापि, आयक्यूओओने अधिकृत लाँचतपशील जाहीर केलेला नाही. उत्तराधिकारी कसा दिसेल हे जाणून घेण्यासाठी आयक्यूओओ निओ ९ प्रो 5G फीचर्स पाहुयात.
आयक्यूओ निओ ९ प्रो 5G मध्ये ६.७८ इंचाचा एलटीपीओ एमोलेड डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ३००० निट्स पीक ब्राइटनेस देतो. यात एक अनोखे वेट हँड टच फीचर देण्यात आले आहे, ज्याद्वारे वापरकर्ते हात ओले असताना त्याचा वापर करू शकतात. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेटसह येतो. यात १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळत आहे. हा स्मार्टफोन 'एक्सटेंडेड रॅम' टेक्नोलॉजीने सुसज्ज आहे, जो रॅम क्षमता दुप्पट करतो, जसे की ८ जीबीचे १६ जीबीमध्ये रूपांतर करतो. यात ५० मेगापिक्सल आयएमएक्स ९२० नाइट व्हिजन प्रायमरी कॅमेरा आणि ८ एमपी अल्ट्रावाइडसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, दुय्यम कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५ हजार १६० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.