मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO 2022 : सरत्या वर्षात आले ४१ आयपीओ, काही हिट तर काही फ्लाॅप, या कंपन्यांनी दिला जबरदस्त रिटर्न्स

IPO 2022 : सरत्या वर्षात आले ४१ आयपीओ, काही हिट तर काही फ्लाॅप, या कंपन्यांनी दिला जबरदस्त रिटर्न्स

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 30, 2022 08:38 AM IST

IPO 2022 : 2022 या वर्षी एकूण ४१ कंपन्यांनी त्यांचे आयपीओ आणले. ज्यामध्ये काही कंपन्यांनी प्राथमिक बाजारात चांगलीच चमक दाखवली, तर काही आयपीओ अयशस्वी ठरले. कुठला आयपीओ ठरला सर्वाधिक हीट जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

IPO 2022_HT
IPO 2022_HT

IPO 2022 : 2022 हे वर्ष आता संपणार आहे. शेवटचा आठवडा संपायला आता अवघे दोन दिवस उरले आहेत. या वर्षी शेअर बाजारात अनेक आयपीओ आले. या वर्षी एकूण ४१ कंपन्यांनी शेअर बाजारात प्रवेश केला. या वर्षी अनेक आयपीओ आले, त्यापैकी अनेक कंपन्यांचे आयपीओ खूप मोठे ठरले पण काही आयपीओ फ्लॉपही ठरले. तुम्हीही या आयपीओमध्ये काही पैसे गुंतवले असतील.तुम्हाला त्यातून फायदा मिळाला असेल अथवा थोडेसे नुकसानही झाले असेल. काही आयपीओला सॉलिड लिस्टिंग मिळाले पण काही डिस्काउंटसह लिस्ट झाले.

४१ कंपन्यांनी कमावले अंदाजे ६४३७० कोटी रुपये

यावर्षी एकूण ४१ कंपन्यांनी प्राथमिक बाजारातून शेअर बाजारात प्रवेश केला. या ४१ कंपन्यांनी यावर्षी एकूण ६४३७० कोटी रुपये उभे केले. यापैकी ७३ टक्के ओएफएस म्हणजे ऑफर फॉर सेल आणि उर्वरित नवीन इश्यूच्या माध्यमातून बाजारात उतरले आहेत.

सर्वाधिक सबस्क्रिप्शन्स हर्षा इंजिनिअर्सला

हर्षा इंजिनियरिंगआयपीओला सर्वाधिक सबस्क्रिप्शन मिळाले आहे. या कंपनीच्या आयपीओला ७४.७ पट सबस्क्रिप्शन मिळाले. यानंतर, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट (इलेक्ट्रॉनिक मार्ट आयपीओ) चे लिस्टिंग ७१.९ पट भरले गेले. डीसीएक्स सिस्टिमचा आयपीओ सर्वाधिक सबस्क्रिप्शनच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. या शेअर्सचे सबस्क्रिप्शन ६९.८ पट झाले होते.

या IPO ला सर्वात कमी सबस्क्रिप्शन मिळाले

सर्वात कमी सबस्क्रिप्शन मिळालेल्या आयपीओमध्ये रेडियन्ट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस पहिल्या क्रमांकावर आहे. त्याला फक्त ०.५३ पट सबस्क्रिप्शन मिळाले. त्यापाठोपाठ फाइव्ह स्टार बिझनेस आयपीओ आहे, ज्याला ०.७ पट सबस्क्रिप्शन मिळाले आणि तिस-या क्रमांकावर इथॉस कंपनी आहे, ज्याला फक्त १.१ पट सबस्क्रिप्शन मिळाले.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग