IPO alert : गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा! मोबिक्विकसह ५ कंपन्यांचे आयपीओ आज बंद होणार, वेळ घालवू नका!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO alert : गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा! मोबिक्विकसह ५ कंपन्यांचे आयपीओ आज बंद होणार, वेळ घालवू नका!

IPO alert : गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा! मोबिक्विकसह ५ कंपन्यांचे आयपीओ आज बंद होणार, वेळ घालवू नका!

Dec 13, 2024 10:47 AM IST

IPO Subscription Last Day : मोबिक्विक आणि विशाल मेगामार्ट यासह ५ कंपन्यांच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची आज शेवटची संधी आहे.

IPO alert : गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा! मोबिक्विकसह ५ कंपन्यांचे आयपीओ आज बंद होणार, वेळ घालवू नका!
IPO alert : गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा! मोबिक्विकसह ५ कंपन्यांचे आयपीओ आज बंद होणार, वेळ घालवू नका!

IPO News Today : आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. चालू आठवड्यात बाजारात आलेल्या ५ कंपन्यांच्या आयपीओचं सबस्क्रिप्शन आज बंद होणार आहे. यात मोबिक्विक, विशाल मेगामार्ट सारख्या बड्या कंपन्यांचाही समावेश आहे.

मोबिक्विक आयपीओ

मोबिक्विक कंपनीचा आयपीओ ११ डिसेंबर रोजी खुला झाला. कंपनीच्या आयपीओसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे. कंपनीनं आयपीओसाठी २६५ ते २७९ रुपये प्रति शेअर किंमत पट्टा निश्चित केला आहे. पहिल्या दोन दिवसांत हा आयपीओ २१.६७ पट सब्सक्राइब झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये हा आयपीओ आज १५६ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे.

विशाल मेगा मार्ट

विशाल मेगा मार्ट कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये १६ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. आयपीओ ११ डिसेंबर रोजी खुला झाला. कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी आज शेवटची संधी आहे. आयपीओचा आकार ८,००० कोटी रुपये आहे. आयपीओसाठी कंपनीनं ७४ ते ७८ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. पहिल्या दोन दिवसांत हा आयपीओ जवळपास २ पट सब्सक्राइब झाला आहे.

पर्पल युनायटेड सेल्स 

हा एनएसई एसएमई आयपीओ ११ डिसेंबर रोजी उघडला. आयपीओसाठी कंपनीनं प्रति शेअर १२१ ते १२६ रुपये प्राइस बँड निश्चित केला आहे. आयपीओचा लॉट साइज १००० शेअर्स आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांना १,२६,००० रुपये मोजावे लागणार आहेत. दोन दिवसांत हा आयपीओ १८ पट सब्सक्राइब झाला आहे. आज या आयपीओचा जीएमपी ५० रुपये आहे.

सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट

हा एसएमई सेगमेंटचा आयपीओ आहे. कंपनीचा आयपीओ आज २४ रुपयांच्या जीएमपीवर व्यवहार करत आहे. आयपीओचा आकार ५० कोटी रुपये आहे. तर प्राइस बँड ७२ ते ७६ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. आतापर्यंत हा आयपीओ ४ पटीपेक्षा जास्त सब्सक्राइब झाला आहे.

साई लाइफ सायन्सेस

आयपीओ या मेनबोर्ड आयपीओसाठी किंमत पट्टा ५२२ ते ५४९ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. कंपनीनं एकूण २७ शेअर्स बनवले आहेत. या आयपीओला पहिल्या दोन दिवसांत १.२६ पट सब्सक्रिप्शन मिळालं आहे. या आयपीओचा जीएमपी १९ रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner