IPO Listing : लिस्टिंगनंतरही उसळला डेल्टा कॉर्पचा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा नफा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO Listing : लिस्टिंगनंतरही उसळला डेल्टा कॉर्पचा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा नफा

IPO Listing : लिस्टिंगनंतरही उसळला डेल्टा कॉर्पचा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा नफा

Jan 14, 2025 01:10 PM IST

Delta Autocorp Limited share Listing : इलेक्ट्रिक वाहनं बनविणाऱ्या डेल्टा ऑटोकॉर्प लिमिटेड या कंपनीचा आयपीओ आज शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला. पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना बक्कळ नफा मिळवून दिला.

IPO Listing : डेल्टॉ ऑटोकॉर्पच्या शेअर जबरदस्त लिस्टिंग; गुंतवणूकदारांना मोठा नफा
IPO Listing : डेल्टॉ ऑटोकॉर्पच्या शेअर जबरदस्त लिस्टिंग; गुंतवणूकदारांना मोठा नफा

IPO News in Marathi : भारतातील ईव्ही व्यवसायातील प्रमुख कंपनी डेल्टा ऑटोकॉर्प लिमिटेडचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. एनएसई इमर्जिंग प्लॅटफॉर्मवर कंपनीचे शेअर्स लिस्ट झाले आहेत. डेल्टा ऑटोकॉर्प लिमिटेडचा आयपीओमधील १३० रुपयांच्या किमतीपेक्षा ३५ टक्क्यांनी वाढून १७५ रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंग नंतर हा शेअर १८३.७५ रुपयांवर पोहोचला. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जवळपास ४२ टक्के नफा झाला.

डेल्टा ऑटोकॉर्पचा एसएमई आयपीओ निविदेच्या शेवटच्या दिवशी ३०९ पट सब्सक्राइब झाला होता. गुंतवणूकदारांनी ४.५८ लाख अर्जांद्वारे ३०.३ लाख समभागांच्या ऑफर साईजच्या तुलनेत ९३.६३ कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लावली. 

डेल्टिक ब्रँडच्या नावानं इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनं बनविणाऱ्या कंपनीनं आयपीओच्या माध्यमातून ५४.६० कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. हा इश्यू ७ जानेवारी रोजी १२३ ते १३० रुपये प्रति शेअरच्या दरानं सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. या आयपीओमध्ये ५०.५४ कोटी रुपये किंमतीचे ३८.८८ लाख नवे शेअर्स आणि ४.०६ कोटी रुपयांच्या ३.१२ लाख शेअर्सच्या विक्रीचा (OFS) समावेश होता.

काय आहे कंपनीचा व्यवसाय आणि पसारा?

२०१६ मध्ये स्थापन झालेली डेल्टा ऑटोकॉर्प भारतातील ईव्ही क्रांतीत आघाडीवर आहे. कंपनी डेल्टिक ब्रँडअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची विक्री करते. देशातील २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कंपनीचे ३०० हून अधिक डीलर्स आहेत. 

डेल्टानं भारताच्या ग्रामीण आणि निमशहरी बाजारपेठांना यशस्वीरित्या सेवा दिली आहे. परवडणारी, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक वाहतूक उपाय दिले आहेत. ही कंपनी पश्चिम बंगालच्या बर्धमान इथं आणि दिल्ली एनसीआर इथं अशी  दोन अत्याधुनिक उत्पादन केंद्रं चालवते. डेल्टाच्या इलेक्ट्रिक स्कूटर, रिक्षा, लोडर, कचऱ्याच्या गाड्या आणि सुट्या भागांच्या उत्पादनात ही केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावतात.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner