iPhone SE 4: सर्वाधिक चर्चेत आयफोन एसई ४ लवकरच लॉन्च होण्याची शक्यता; लॉन्चिंगपूर्वीच कॅमेरा, डिझाइन लीक!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  iPhone SE 4: सर्वाधिक चर्चेत आयफोन एसई ४ लवकरच लॉन्च होण्याची शक्यता; लॉन्चिंगपूर्वीच कॅमेरा, डिझाइन लीक!

iPhone SE 4: सर्वाधिक चर्चेत आयफोन एसई ४ लवकरच लॉन्च होण्याची शक्यता; लॉन्चिंगपूर्वीच कॅमेरा, डिझाइन लीक!

Updated Oct 14, 2024 06:03 PM IST

iPhone SE 4 Features Leaked: लवकरच आयफोन एसई ४ लवकरच स्मार्टफोन बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे. आयफोन एसई ४ हा सध्या अ‍ॅपल चाहत्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे.

आयफोन एसई ४ लवकरच बाजारात लॉन्च होण्याची शक्यता
आयफोन एसई ४ लवकरच बाजारात लॉन्च होण्याची शक्यता (AppleTrack)

iPhone News: बहुप्रतिक्षित आयफोन एसई ४ लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. हा कंपनीचा मिड-रेंज स्मार्टफोन असेल, यामुळे अनेकांचे आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अ‍ॅपलने गेल्या महिन्यात आयफोन १६ सीरिज लॉन्च केली, तेव्हापासून आयफोन एसई ४ सर्वाधिक चर्चेत आहे. आयफोन एसई ४ कधी लॉन्च होणार आहे? याबाबत कंपनीकडून अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नाही. मात्र, त्यापूर्वीच आयफोन एसई ४ मधील कॅमेरा, डिझाइनबद्दल माहिती लीक झाली आहे.

आयफोन एसई ३ २०२२ मध्ये लॉन्च करण्यात आला. अ‍ॅपल आपल्या आगामी उत्पादनाबद्दल काहीही उघड करत नाही. मात्र, तरीही लीकर्स आणि विश्लेषक बर्याचदा खरेदीदारांना काय मिळू शकते, याबाबत चर्चा करतात. गेल्या काही आठवड्यांपासून इंटरनेटवर आयफोन एसई ४ बद्दल माहितीच्या लाटा उसळत आहेत. नुकतीच आयफोन एसई ४ मधील कॅमेरा आणि डिझाइनबद्दल माहिती सोशल मिडियावर लीक झाली आहे.

लीकर सोनी डिक्सनने एक्सवर आगामी आयफोन एसई ४ चा फोटो शेअर केला. त्यानुसार असे समजत आहे की, आयफोन एसई ४ मध्येही आयफोन एसई ३ प्रमाणे कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, अ‍ॅपल म्यूट स्विच आणि व्हॉल्यूम बटणांच्या पोझिशनमध्ये बदल करण्यात आला नाही, असेही दिसत आहे.

लीक झालेल्या आयफोन एसई ४ डिव्हाइसच्या आकाराबद्दल फारशी माहिती देण्यात आली नाही. परंतु, आधीच्या मॉडेलपेक्षा वेगळे असण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, आयफोन एसई ४ मार्च २०२५ मध्ये लॉन्च होणार आहे. आयफोन एसई ४ मध्ये ६.०६ इंचाचा मोठा ओएलईडी डिस्प्ले मिळेल. तर, आयफोन एसई ३ मध्ये ४.७ इंचाचा मोठा ओएलईडी डिस्प्ले मिळतो. टच आयडीऐवजी फेस आयडी मिळवणारा आयफोन एसई ४ हा अ‍ॅपलचा पहिला एसई फोन असेल. आतापर्यंत लॉन्च करण्यात आलेले तीनही आयफोन एसई मॉडेल्स जुन्या आयफोन मॉडेल्सवर आधारित होते, जे सुरक्षेसाठी टच आयडीचा वापर करत होते.

आयफोन एसई ४ यूएसबी-सी पोर्ट मिळवणारा अ‍ॅपलचा पहिला मिड-रेंज स्मार्टफोन असेल. अ‍ॅपल लाइटनिंग पोर्टपासून वेगळे होत असून आयफोनसह अ‍ॅपलच्या सर्व नवीन डिव्हाइसमध्ये आता यूएसबी-सी चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. लाँचिंगनंतर, आयफोन एसई ४ यूएसबी-सी सुविधा देणारा अ‍ॅपलचा पहिला आणि एकमेव मिड-रेंजर असेल.

अ‍ॅपल इंटेलिजन्सला काम करण्यासाठी कमीत कमी ८ जीबी रॅमची आवश्यकता आहे आणि आयफोन एसई ४ ला अ‍ॅपल इंटेलिजन्स मिळाल्यास ८ जीबी रॅम देखील मिळेल. नवीन डिझाइन, शक्तिशाली चिपसेट, ओएलईडी डिस्प्ले आणि प्रगत अ‍ॅपल इंटेलिजन्स वैशिष्ट्यांसह, आयफोन एसई ४ एक आकर्षक खरेदी असू शकते.

Whats_app_banner