iPhone: डिस्प्ले एकाचा, कॅमेरा दुसऱ्याचा आणि चिपसेट तयार करणारे वेगळेच; आयफोनसाठी 'या' कंपन्या बनवतात पार्ट्स!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  iPhone: डिस्प्ले एकाचा, कॅमेरा दुसऱ्याचा आणि चिपसेट तयार करणारे वेगळेच; आयफोनसाठी 'या' कंपन्या बनवतात पार्ट्स!

iPhone: डिस्प्ले एकाचा, कॅमेरा दुसऱ्याचा आणि चिपसेट तयार करणारे वेगळेच; आयफोनसाठी 'या' कंपन्या बनवतात पार्ट्स!

Jun 10, 2024 06:49 PM IST

iPhone Parts Manufacturing Company: आयफोनसाठी कोणकोणत्या कंपनी पार्ट्स बनवतात, हे जाणून घेऊयात.

लवकरच आयफोन १६ बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
लवकरच आयफोन १६ बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

iPhone News: आयफोनचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. आयफोनकडे केवळ एक स्मार्टफोन म्हणून पाहिले जात नाही. तर, स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहतात. आयफोन खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, आयफोनच्या किंमती पाहून तो खरेदी करणं अनेकांना शक्यही नसते. परंतु, तुम्हाला हे माहिती आहे का, अँड्रॉइड स्मार्टफोन निर्माता कंपन्या आयफोनचा डिस्प्ले, कॅमेरा आणि चिपसेट तयार करतात. या कंपन्यांची नावे वाचून अनेकजण आश्चर्यचकीत होतात. तर, आयफोनमध्ये वापरलेले पार्ट्स कोणती कंपनी बनवते? हे जाणून घेऊयात.

आयफोनमधील पार्ट्स बनवणाऱ्या कंपन्या

  • सॅमसंग, एलजी आणि बीओई यांसारख्या कंपन्या आयफोनसाठी डिस्प्ले बनवतात. सॅमसंग ॲपलच्या आयफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या सुपर रेटिना ओएलईडी पॅनल्सचा एक प्रमुख पुरवठादार आहे.
  • आयफोनमधील चिपसेट बनवण्याचे काम टीएसएमसीद्वारे केले जाते,जे सामान्यतः अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर वापरतात. याशिवाय, सॅमसंग आणि इंटेलने ॲपलच्या अनेक मॉडेल्ससाठी चिपसेट बनवले आहे.
  • क्वालकॉम कंपनी आयफोनसाठी नेटवर्क कनेक्टिव्हिटी चिप्स डिझाइन करते.
  • आयफोन डिस्प्लेच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचा वापर केला जातो.हीच कंपनी जवळपास सर्व अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी प्रोटेक्टर ग्लास बनवते.
  • सोनी कंपनी आपल्या उत्तम कॅमेरा सेन्सर्ससाठी जगभरात ओळखली जाते. आयफोनच्या कॅमेऱ्यात सोनीचे सेन्सर्स बसवले जातात.
  • आयफोनमध्ये सोनी, एटीएल आणि एलजी यांसारख्या कंपन्यांच्या बॅटरी वापरली जाते.
  • वेस्टर्न डिजिटल आणि किओक्सी मेमरी चिप्स वापरल्या जातात.
  • आयफोन असेंबल करण्यासाठी पेगाट्रॉन, फॉक्सकॉन या कंपन्यांची मदत घेते. भारतातही आयफोन असेम्बल करण्याचे काम याच कंपन्या करतात.
  • महत्त्वाचे म्हणजे, ॲपल फक्त आपल्या आयफोनची रचना करण्याचे काम करते. यानंतर फोनचे सॉफ्टवेअर डिझाइन करण्याचे काम ॲपल स्वतः करते.

    Redmi 13 Launched: १०८ मेगापिक्सलसह रेडमी १३ लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि इतर दमदार फीचर्स!

आयफोन १६ चे फीचर्स लीक

दरवर्षीप्रमाणे यंदाही अ‍ॅपल सप्टेंबर महिन्यात आपली लेटेस्ट आयफोन सीरिज लॉन्च करण्याची शक्यता आहे. कंपनी आयफोनच्या डिझाइनमध्ये काही मोठे बदल करण्याचा विचार करू शकते. व्हॅनिला आयफोन १६ व्हेरियंटला स्थानिक व्हिडिओ रेकॉर्ड करता यावा, यासाठी नवीन बदल केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, अ‍ॅपल आयफोन १६ मध्ये नवीन टेट्राप्रिझम ५ एक्स ऑप्टिकल झूम लेन्स जोडण्याची शक्यता आहे, जी मागील पिढीच्या आयफोन १५ लाइनअपसह प्रो लाइनअपसाठी राखीव होती. कॅमेरा लेआऊटमध्ये बदल करण्याव्यतिरिक्त अ‍ॅपल अखेर या वर्षी आयफोन १६ आणि आयफोन १६ प्लस लाइनअपमध्ये अ‍ॅक्शन बटण जोडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, अ‍ॅक्शन बटणाने गेल्या वर्षीच्या प्रो लाइनअपवरील म्यूट स्विचची जागा घेतली होती.

बॅटरी क्षमतेत वाढ होण्याची शक्यता

आयफोन १५ च्या तुलनेत आयफोन १६ मध्ये बॅटरी क्षमतेच्या बाबतीत ६ टक्के वाढ मिळू शकते. आयफोन १६ मध्ये ३ हजार ५६१ एमएएच क्षमतेची बॅटरी असू शकते. तर, गेल्या जनरेशनच्या आयफोन १५ मध्ये ३ हजार ३४९ एमएएच बॅटरी देण्यात आली. अ‍ॅपल आपल्या आयफोन १६ बॅटरीसाठी मेटल कव्हरिंगचा वापर करणार असल्याचे वृत्त आहे. या बदलामुळे आयफोन १५ च्या वापरकर्त्यांना भेडसावणाऱ्याा उष्णतेच्या तक्रारी टाळता येतील, अशी अपेक्षा आहे.

Whats_app_banner