iPhone 16 and iPhone 17: जगातील आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी अॅप्पल आता २४ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेल्या आयफोन मॉडेलवर काम करत आहे. तंत्रज्ञान विश्लेषक मिंग-ची कुओ यांनी अॅप्पलच्या आयफोन १७ बद्दल माहिती दिली, ज्यात फ्रंट कॅमेरामध्ये मोठा अपग्रेड मिळणार असल्याचा त्यांनी दावा केला. त्यानुसार, आयफोन १७ मध्ये २४ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल, जो आयफोन १४ आणि आयफोन १५ पेक्षा चांगला कॅमेरा मिळेल. आयफोनमधील सेल्फी कॅमेरा अपग्रेड होण्यासाठी आणखी बराच वेळ आहे. परंतु, लवकरच युजर्सची प्रतिक्षा संपणार आहे.
लीक माहितीनुसार, वाढत्या रिझोल्यूशनमुळे आयफोनच्या इतर मॉडेलपेक्षा आयफोन १७ मध्ये सेल्फी मिळेल. आयफोन १७ द्वारे काढलेला फोटो क्रॉप केला तरीही त्याची गुणवत्ता खराब होणार नाही. ही सेल्फीची आवड असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी मोठी गोष्ट असेल. महत्त्वाचे म्हणजे, आयफोन १७ च्या वापरकर्त्यांना अंधारातही चांगले फोटो क्लिक करता येणार आहेत. तैवानची कंपनी युजिंगगुआंग आयफोन १७ साठी नवीन LAS सिस्टम प्रदान करण्यासाठी सज्ज आहे. सध्याच्या 5P लेन्स सिस्टीमपेक्षा हे १०० ते १२० टक्क्यांनी महाग आहे. यामुळे असे स्पष्ट होते की आयफोन १७ सीरिज अधिक महाग असू शकते. आयफोन १७ मध्ये अंडर डिस्प्ले फेस आयडी मिळण्याची शक्यता आहे.
कंपनी आयफोन १६ प्रोसाठी पेरिस्कोप लेन्स सेटअपवरही काम करत असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये अधिक झूम कॅमेरा अपेक्षित आहे, हे फीचर्स सध्या मोठ्या आणि अधिक महाग आयफोन १५ प्रो मध्ये मिळत आहे. आयफोन १६ प्रो सीरिजमध्ये हाय रिझोल्यूशन ४८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळण्याची शक्यता आहे. आयफोन १६ आणि आयफोन १७ च्या आगमनाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. लीक झालेल्या माहितीवरून असे स्पष्ट होते की, अॅप्पल सेल्फी कॅमेरा अपग्रेड करण्यासाठी अधिक जोर देत आहे.