मोठा डिस्प्ले, दमदार कॅमेरा आणि...; आयफोन १७ मध्ये मिळणार आहेत अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  मोठा डिस्प्ले, दमदार कॅमेरा आणि...; आयफोन १७ मध्ये मिळणार आहेत अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स

मोठा डिस्प्ले, दमदार कॅमेरा आणि...; आयफोन १७ मध्ये मिळणार आहेत अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स

Dec 30, 2024 05:42 PM IST

iPhone 17 Specs Leaked: आयफोन 17 लाइनअपबद्दल च्या अफवा आधीच पसरल्या आहेत. नवीन आयफोन सप्टेंबर २०२५ मध्ये लॉन्च होणार आहे.

आयफोन १७ मध्ये मिळणार आहेत अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स
आयफोन १७ मध्ये मिळणार आहेत अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स

iPhone 17 Design, Specs And Price: अ‍ॅपल आयफोन१६ सीरिज लॉन्च झाल्यापासून आयफोन १७ लाइनअपबद्दलच्या अफवा सुरु झाल्या आहेत. नवीन आयफोन सप्टेंबर २०२५ मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, आयफोन १७ लाइनअपचे डिझाइन आणि कॅमेरा आतापर्यंत आलेल्या आयफोनपेक्षा पूर्णपणे वेगळा असेल, असे सांगितले जात आहे.य

लीक झालेल्या माहितीनुसार आयफोन १७ लाइनमध्ये आयफोन १७. आयफोन १७ प्रो, आयफोन १७ प्रो मॅक्स आणि नवीन मॉडेल आयफोन १७ स्लिम किंवा एअर असे चार मॉडेल बाजारात दाखल होणार आहेत. बेस आयफोन १७ मध्ये सध्याच्या ६.१ इंचावरून ६.३ इंचाचा मोठा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.

दमदार फीचर्स मिळण्याची शक्यता

सध्याच्या अ‍ॅपलमध्ये १२ एमपी फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे, तर नवीन फोनमध्ये २४ एमपी फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.. उच्च दर्जाच्या मोबाइल फोटोग्राफीची वाढती मागणी लक्षात घेऊन नव्या सीरिजमध्ये उत्तम सेल्फी आणि चांगले लो लाइट फोटोग्राफी कॅमेरे दिले जाण्याची शक्यता आहे. आयफोन १७ सीरिजमध्ये नवीन अँटी-रिफ्लेक्टिव्ह कोटिंग असू शकते, जे सध्याच्या सिरॅमिक शील्डपेक्षा अधिक कठीण आणि स्क्रॅच-प्रतिरोधक आहे. सर्व मॉडेल्स अ‍ॅपलच्या नेक्स्ट जनरेशन ए १९ चिपवर चालतील, अशी चर्चा आहे, जी वेगवान परफॉर्मन्स आणि चांगल्या बॅटरी बॅकअपसह येऊ शकते. याशिवाय, हा फोन कस्टम ब्लूटूथ आणि वाय-फाय ७ चिप्स सारख्या अखंड कनेक्टिव्हिटीसह येण्याची शक्यता आहे.

आयफोन १७ ची भारतात किती किंमत असेल?

आयफोन १७ भारतात ७९ हजार 900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च होण्याची शक्यता आहे. दरवर्षी अ‍ॅपल सप्टेंबर महिन्यात आयफोनच्या नवी सीरिज लॉन्च करते. आयफोन १६ प्रमाणे आयफोन १७ देखील पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच लॉन्च केला जाईल, अशी शक्यता आहे.

 

Whats_app_banner