iPhone 16 vs iPhone 15: अॅपलने आपली नवीन आयफोन १६ सीरीज लॉन्च केली आहे, ज्यात आयफोन १६, आयफोन १६ प्लस, आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्स अशा एकूण चार मॉडेलचा समावेश आहे. आयफोन १६ सीरिज डिझाइन, एआय फीचर्स, सॉफ्टवेअर आणि इतर अनेक अपग्रेडसह लॉन्च करण्यात आली. दरम्यान, आयफोन १६ आणि आयफोन १५ मध्ये नेमका फरक काय? हे जाणून घेऊयात.
आयफोन १५ प्रमाणे नुकताच लॉन्च झालेल्या आयफोन १६ मध्ये ४८ मेगापिक्सेल रिझोल्यूशनसह नवीन मेन फ्यूजन कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे.
आयफोन १६ मध्ये नवीन ए १८ चिपसेट आणि ६ जीबी रॅम आहे, ज्यामुळे तो आयफोन १५ पेक्षा ३० टक्के वेगवान आहे. तसचे आयफोन १६ मधील बॅटरी आयफोन १५ च्या तुलनेत अधिक शक्तिशाली आहे.
आयफोन १६: व्हॅनिला आयफोन १६ (१२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी) तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. आयफोन १६ ची सुरुवातीची किंमत ७९ हजार ९०० रुपये आहे.
आयफोन १६ प्लस: भारतात आयफोन १६ प्लस १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी अशा तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल, ज्याची सुरुवाती किंमत ८९ हजार ९०० रुपये असेल.
आयफोन १६ प्रो: आयफोन १६ प्रो मॉडेल १२८ जीबी, २५६ जीबी, ५१२ जीबी आणि १ टीबी अशा चार स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. या मॉडेल्सची किंमत अनुक्रमे १ लाख १९ हजार ९०० रुपये, १ लाख २९ हजार ९०० रुपये, १ लाख ४९ हजार ९०० रुपये आणि १ लाख ६९ हजार ९०० रुपये इतकी आहे.
आयफोन १६ प्रो मॅक्स हे २५६ जीबी, ५१२ जीबी आणि १ टीबी या तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आले. या मॉडेलची किंमत अनुक्रमे १ लाख ४४ हजार ९००, १ लाख ६४ हजार ९०० आणि १ लाख ८४ हजार ९०० रुपये इतकी आहे.