आयफोन १६ सीरिज कालपासून (१३ सप्टेंबर) भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाली आहे. या नवीन लाइनअपमध्ये आयफोन १६, आयफोन १६ प्लस, आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. हे नवीन डिव्हाइस खरेदी करू इच्छिणारे ग्राहक विविध चॅनेलद्वारे प्री-बुकिंग करू शकतात. आयफोन १६ ची प्री-ऑर्डर कशी आणि कुठून करायची, याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
आयफोन सीरिजमधील फोन ऑर्डर करण्यासाठी ग्राहक अॅपल स्टोअर ऑनलाइन, अॅपल स्टोर साकेत (दिल्ली), अॅपल स्टोअर बीकेसी (मुंबई), फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, क्रोमा, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्स, युनिकॉर्न स्टोअर्स, इमॅजिन स्टोअर्स, एमअॅपल स्टोअर्स, आयकॉन्सेप्ट स्टोअर, आयप्लॅनेट स्टोअर्स आणि एट्रोनिक्स स्टोअर्स येथे भेट देऊ शकतात.
अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि अमेरिकन एक्सप्रेसच्या क्रेडिट कार्डसह अॅपल स्टोअरवरून प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना ५००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. ही सवलत आयफोन १६, आयफोन १६ प्लस, आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्ससह आयफोन १६ सीरिजच्या सर्व मॉडेल्सवर लागू आहे. नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय निवडणाऱ्यांसाठी बहुतांश आघाडीच्या बँका ३ किंवा ६ महिन्यांच्या पेमेंट प्लॅन ऑफर करतात. अॅपलचा ट्रेड-इन प्रोग्राम नवीन आयफोनच्या खरेदीसाठी ४००० रुपयांपासून ६७ हजार ५०० रुपयांपर्यंतच्या क्रेडिटसाठी जुने डिव्हाइस एक्स्चेंज करण्याचा अतिरिक्त पर्याय प्रदान करतो. ग्राहकांना अॅपल म्युझिक, अॅपल टीव्ही + आणि अॅपल आर्केडचे ३ महिन्यांचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.
अॅपलने आपल्या आयफोन १५ आणि आयफोन १४ मॉडेलच्या किंमतीत १० हजार रुपयांची कपात केली आहे. मात्र, कंपनीने आयफोन १५ प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त, आयफोन १५, आयफोन १५ प्लस खरेदीवर त्वरीत ४००० रुपयांचे कॅशबॅक मिळत आहे. तर, आयफोन १४, आयफोन १४ प्लसवर ३००० हजारांची सूट मिळत आहे. अमेरिकन एक्सप्रेस, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्डसह जुन्या मॉडेल्सवर सहा महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय प्लॅनसह ही ऑफर उपलब्ध आहे.