iPhone 16: आयफोन १६ सीरिज लॉन्च होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. भारतीय वेळेनुसार, आज रात्री १०.३० वाजता अॅपल अखेर बहुप्रतीक्षित आयफोन १६ लॉन्च करणार आहे. दरम्यान, आयफोन १६ बाजारात दाखल झाल्यानंतर आयफोनच्या जुन्या मॉडेलच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. अॅपलने आयफोन १५ आणि आयफोन १४ च्या किंमतीत लक्षणीय कपात करण्याची तयारी केली आहे. यामुळे आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.
आपण पाहत आलो आहोत की, ज्यावेळी अॅपल नवी सीरिज लॉन्च करते. त्यापूर्वी जुन्या मॉडेलच्या किंमतीत घट होते. आयफोन १५, आयफोन १४ आणि आयफोन १३ सीरिजच्या लॉन्चिंगनंतर या गोष्टी सातत्याने पाहायला मिळाल्या. यामुळे आयफोन १६ सीरिज लॉन्चिंगनंतर आयफोन १५ च्या किंमतीत कपात केली जाईल, यात काही शंका नाही.
अॅपलने आयफोन १४ सीरिज लॉन्च केल्यानंतर आयफोन १३ च्या किंमतीत १० हजार रुपयांची कपात केली होती. त्यानंतर आयफोन १५ लॉन्च झाल्यानंतर कंपनीने याचीच पुनरावृत्ती केली आणि आयफोन १४ च्या किंमतीत १० हजार रुपयांची कपात केली. यावर्षीही अॅपल इव्हेंट २०२४ मध्ये आयफोन १५ खूप स्वस्त मिळेल, असे मानले जात आहे. आयफोन १६ लॉन्च झाल्यानंतर आयफोन १५ च्या किंमतीत १९ हजारांची कपात केली जाईल, असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.
अॅपलने नुकतेच भारतात आयफोन १५ सीरिज मॉडेल्सच्या किंमतीत कपात केली आहे. आयफोन १५ प्रो मॅक्सच्या किंमतीत सर्वात मोठी कपात झाली आहे. तर,आयफोन १५ च्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. म्हणजेच आयफोन १६ झाल्यानंतर अॅपलने आयफोन १५ च्या किंमतीत १० हजार रुपयांची कपात केली. तर, आयफोन १५ ची किंमत ६९ हजार ६०० रुपये होईल.
अॅपल इव्हेंट २०२४ मध्ये आयफोन १६, आयफोन १६ प्रो, आयफोन १६ प्रो मॅक्स आणि आयफोन १६ प्लस यांचा समावेश असेल. गेल्या अनेक दिवसांपासून आयफोन १६ सीरिजच्या डिझाइनबद्दल बोलले जात आहे. मात्र, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणीतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. अॅपल इव्हेंट २०२४ नंतरच समजू शकेल की, नेमका आयफोन १६ सीरिज नेमकी कशी दिसते.