Flipkart Big Diwali Sale: फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तूसह स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या सेलअंतर्गत ग्राहकांचे आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. फ्लिपकार्टवर आयफोन १५ ५५ हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. याशिवाय, आयफोन १५ च्या खरेदीवर ग्राहकांना कार्ड डिस्काऊंट देखील मिळत आहे.
फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलदरम्यान आयफोन १५ अवघ्या ५४ हजार ९९९ रुपयांत लिस्ट करण्यात आला आहे. ग्राह एसबीआय क्रेडिट कार्ड वापरुन ३ हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. ज्यामुळे आयफोनची किंमत ५१ हजार ९९९ रुपये झाली. आयफोन १५ गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ७९ हजार ९९० रुपयांत लॉन्च झाला होता. मात्र, आयफोन १६ सीरिज लॉन्च झाल्यानंतर आयफोन १५ च्या किंमतीत कपात करण्यात आली. अॅपलच्या अधिकृत वेबसाईटवर आयफोन १५ ची किंमत अजूनही ६९ हजार ९०० रुपये आहे.
आयफोन १५ मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. अॅपलफ्लॅगशिप नवीन डायनॅमिक आयलंड टेक्नोलॉजीसह येते.
आयफोन १५ मध्ये एक वाढीव कॅमेरा सिस्टम आहे, ज्यात क्वाड पिक्सल सेन्सरसह ४८ एमपी प्रायमरी कॅमेरा आणि रॅपिड ऑटोफोकससाठी १०० टक्के फोकस पिक्सेल आहे. याशिवाय, यात सुपर-हाय-रिझोल्यूशन डिफॉल्ट सेटिंग मिळते. आयफोन १५ वापरकर्ते ०.५ एक्स, १ एक्स आणि २ एक्स झूम लेवलवर फोटो कॅप्चर करण्यासाठी २ एक्स टेलिफोटो लेन्सवापरू शकतात.
आयफोन १५ मध्ये अॅपलच्या ए १६ बायोनिक चिपसेटचा समावेश आहे. आयफोन १५ ६ जीबी रॅमसह येतो, जे बहुतेक वापरकर्त्यांसाठी पुरेसे आहे. आयफोन १५ ला नवीनतम आयओएस १८ ऑपरेटिंग सिस्टमचे अपडेट मिळाले आहे. आयफोन १५ मध्ये अॅपल इंटेलिजन्स मिळत नाहीत.
अॅपलने नुकतीच त्यांची आयफोन १६ सीरिज लॉन्च केली आहे. या नवीन लाइनअपमध्ये आयफोन १६, आयफोन १६ प्लस, आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. दरम्यान, आयफोन १६ सीरिजची किंमत जाणून घेऊयात.
१२८ जीबी: ७९ हजार ९०० रुपये
२५६ जीबी: ८९ हजार ९०० रुपये
५१२ जीबी: १ लाख ०९ हजार ९०० रुपये
१२८ जीबी: ८९ हजार ९०० रुपये
२५६ जीबी: ९९ हजार ९०० रुपये
५१२ जीबी: १ लाख १९ हजार ९०० रुपये
१२८ जीबी: १ लाख १९ हजार ९०० रुपये
२५६ जीबी: १ लाख २९ हजार ९०० रुपये
५१२ जीबी: १ लाख ४९ हजार ९०० रुपये
१ टीबी: १ लाख ६९ हजार ९०० रुपये
२५६ जीबी: १ लाख ४४ हजार ९०० रुपये
५१२ जीबी: १ लाख ६४ हजार ९०० रुपये
१ टीबी: १ लाख ८४ हजार ९०० रुपये
संबंधित बातम्या