Christmas iPhone Offers: तुम्ही काही काळापासून आयफोन १५ खरेदी करण्याचा विचार करत आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ख्रिसमस आणि हॉलिडे सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून फ्लिपकार्टवर आयफोनसह अनेक स्मार्टफोन स्वस्तात उपलब्ध झाले आहेत. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या ख्रिसमस स्पेशल डीलमध्ये आयफोन १५ जवळपास ५० हजारांच्या आत खरेदी करू शकतात.
ख्रिसमस स्पेशलचा भाग म्हणून फ्लिपकार्ट आयफोन १५ सवलतीत देत आहे. सध्या अतिरिक्त ऑफर शिवाय हा फोन कलर व्हेरियंटनुसार ५७ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होतो. आयफोन १५ सामान्यत: ६९ हजार ९०० रुपयांच्या आसपास विकला जातो. दरम्यान, फ्लिपकार्टच्या ऑफरमध्ये आयफोन १५ अवघ्या ५० हजारांत कसे मिळायचा? हे जाणून घेऊयात.
फ्लिपकार्टवर आयफोन १५ च्या खरेदीवर ७००० रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस देत आहे. परंतु, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमचा जुना फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल. याशिवाय, अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड असल्यास तुम्हाला २ हजार ३९३ रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. या सर्व ऑफरचा फायदा घेतल्यास तुम्हाला आयफोन १५ अगदी स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
इंटेलिजन्स आणि नवीन कॅमेरा कंट्रोल बटण सोडले तर, आयफोन १६ आणि आयफोन १५ मध्ये कोणताही मोठा बदल नाही. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, आयफोन १५ आणि आयफोन १६ मध्ये कॅमेरा जवळजवळ सेटअप मिळत आहे. दोन्ही डिव्हाइसमध्ये ६० हर्ट्झ डिस्प्ले पॅनेल आहेत, त्यामुळे स्क्रीन परफॉर्मन्समध्येही कोणताही फरक नाही.
आयफोन १६ हा सध्या बाजारात ७९ हजार ९०० रुपयांना उपलब्ध आहे. ऑफलाइन बाजारात ७५ हजार रुपयांच्या आसपास उपलब्ध असल्याचे पाहिले आहे. जर आपण थोडा अधिक खर्च करण्यास तयार असाल आणि आयफोन १५ वर महत्त्वपूर्ण ऑफर्सचा लाभ घेऊ शकत नसाल तर आयफोन १६ ची निवड करणे हा चांगला पर्याय असू शकतो. आयफोन १६ मध्ये ८ जीबी रॅम, अधिक शक्तिशाली प्रोसेसर, रिफ्रेश कॅमेरा मॉड्यूल आणि स्थानिक फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यासारख्या अतिरिक्त क्षमता आहेत. हे फीचर्स आयफोन 15 च्या तुलनेत अधिक फ्यूचर-प्रूफ डिव्हाइस बनवतात.
संबंधित बातम्या